ETV Bharat / state

Police Officer Bribery Case: सहाय्यक पोलीस निरीक्षकाच्यावतीने १ लाखाची लाच घेताना सहाय्यक फौजदाराला रंगेहाथ पकडले

author img

By

Published : Aug 11, 2023, 10:55 PM IST

साताऱ्यातील खटाव तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली आहे. औंध पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाच्या वतीने १ लाखाची लाच घेताना सहाय्यक फौजदाराला सापळा रचून रंगेहाथ पकडण्यात आले आहे. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि सहायक फौजदाराविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

Police Officer Bribery Case
सहाय्यक फौजदाराला रंगेहाथ पकडले

सातारा: परमिट रुममधून दारुची अवैध वाहतूक केल्यामुळे पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये मदत करण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षकाने तक्रारदाराकडे १ लाखाच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षकाच्या वतीने १ लाखाची लाच घेताना सहाय्यक फौजदाराला सापळा रचून रंगेहाथ पकडण्यात आले. या कारवाईमुळे जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

पोलीस दलात खळबळ: खटाव तालुक्यातील औंध पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय परशुराम दराडे आणि सहाय्यक फौजदार बापूसाहेब नारायण जाधव यांच्यावर लाचप्रकरणी गुन्हा नोंद झाला आहे. पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यावर १ लाखाच्या लाच प्रकरणी झालेली ही अलीकडच्या काळातील मोठी कारवाई आहे. यामुळे खटाव तालुक्यात तसेच जिल्हा पोलीस दलात मोठी खळबळ माजली आहे.

एएसआयने स्वीकारली लाच: लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उपअधीक्षक उज्जवल वैद्य यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदारावर परमिट रूममधून दारूची अवैध वाहतूक केल्याप्रकरणी औंध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यात मदत आणि यापुढे कोणताही त्रास न देण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षकाने दीड लाखांची लाच मागितली होती. एक लाख रुपयांवर तडजोड झाल्यानंतर एपीआयच्या वतीने आज लाचेची रक्कम घेताना सहाय्यक फौजदाराला (एएसआय) रंगेहाथ पकडण्यात आले.

जुन्या एसटी स्टँड परिसरात कारवाई: औंधच्या जुना एस टी स्टँड, बाजार पटांगण परिसरात लाच स्वीकारताना एसीबीने सापळा रचून कारवाई केली. औंध पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे. पोलीस उपअधीक्षक श्रीमती उज्जला वैद्य, पोलीस नाईक नीलेश चव्हाण, पोलीस शिपाई तुषार भोसले, निलेश येवले यांच्या पथकाने ही कारवाई केली.

लाच मागितल्यास संपर्क करा: शासकीय अधिकारी/कर्मचारी कोणतेही शासकीय काम करण्यास फी व्यतिरिक्त लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन उपअधीक्षक उज्जला वैद्य यांनी केले आहे.

हेही वाचा:

  1. रायगड: महावितरणच्या 'त्या' लाचखोर कनिष्ठ अभियंत्याला 27 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी
  2. नाशिक: पोलीस चौकीतच लाच स्वीकारताना तीन पोलीस कर्मचाऱ्यांना अटक
  3. 15 हजारांची लाच स्वीकारल्याप्रकरणी बीडीओसह कनिष्ठ लिपिक एसीबीच्या जाळ्यात

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.