ETV Bharat / state

Ambenali Ghat : महाबळेश्वरला येणाऱ्या पर्यटकांसाठी महत्वाची बातमी; 'हा' घाट राहणा्र 15 दिवस बंद - Ambenali Ghat Closed

अतिवृष्टी, भूस्खलन आणि दरडी कोसळण्याच्या घटना वाढत आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाट वाहतुकीसाठी पुढील १५ दिवस बंद ठेवण्याचे निर्देश, रायगड-अलिबागच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

Ambenli Ghat
आंबेनळी घाट वाहतूकीसाठी १५ दिवस बंद
author img

By

Published : Jul 29, 2023, 7:34 PM IST

Updated : Jul 29, 2023, 7:59 PM IST

सातारा : पोलादपूर-महाबळेश्वर (आंबेनळी घाट) हा सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचे निर्देश रायगड-अलिबागच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यामुळे आंबेनळी घाट हा सर्व प्रकारच्या वाहतूकीसाठी पुढील १५ दिवसांकरीता बंद करण्यात आलेला आहे.

दर पंधरा दिवसांनी आढावा घेण्याचे आदेश : पाऊस, भुस्खलन, दरड कोसळणे इत्यादी परिस्थितीचा दर १५ दिवसांनी सविस्तर आढावा घेण्याचे निर्देश पोलीस आणि महसूल प्रशासनाला दिले आहेत. हा घाट बंद ठेवण्याच्या अनुषंगाने स्वयंस्पष्ट अहवाल रायगड-अलिबाग पोलीस अधीक्षक कार्यालय आणि महाड प्रांत कार्यालयाने सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या असल्याची माहिती, अपर जिल्हादंडाधिकारी संदेश शिर्के यांनी दिली आहे.

४५ दिवस घाट होता बंद : आंबेनळी घाट २०२१ मध्ये जुलै महिन्यात ४५ दिवस बंद ठेवण्यात आला होता. अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या होत्या तर काही ठिकाणी रस्ते वाहून गेले होते. त्यावेळी तब्बल ४५ दिवस घाट दुरुस्तीचे काम सुरू होते. काम सुरू असतानाही अधूनमधून दरडी कोसळत होत्या.

केळघर घाटात दरड कोसळली : महाबळेश्वर-केळघर परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. पावसामुळे महाबळेश्वर-सातारा मार्गावरील केळघर घाटात दरड कोसळली आहे. या घटनेमुळे घाटातील वाहतूक काहीकाळ बंद ठेवण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम उपविभागामार्फत दरड काढण्याचे काम सुरु आहे. सध्या या मार्गावर एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे.

इर्शाळवाडीत घडली घटना : राज्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर रायगडमधील इर्शाळवाडीत 19 जुलै राजी दरड कोसळल्याची घटना घडली होती. दरम्यान इर्शाळवाडीवर दरड कोसळल्याने तेथे आतापर्यंत 27 जणांचा मृत्यू झाला आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी गुरुवारी इर्शाळवाडीला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला होता.

हेही वाचा -

  1. Irshalgad Landslide: इर्शाळवाडीचे पुनर्वसन होईपर्यंत आम्ही तुमच्यासोबत: उद्धव ठाकरे
  2. Irshalwadi Landslide : इर्शाळवाडी दुर्घटनेतील रेस्क्यू ऑपरेशन अखेर थांबवले; अद्यापही 57 बेपत्ता, 27 मृत्यू
  3. Madhav Gadgil on Landslide : भूस्खलन दुर्घटनांची पूर्वकल्पना होती, अहवालाकडे कानाडोळा?

Last Updated : Jul 29, 2023, 7:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.