ETV Bharat / state

साताऱ्याच्या पालकमंत्र्यांनी पूरग्रस्तांच्या भावनांशी खेळ केला - अजित पवार - satara flood news

कराड, सांगली, कोल्हापूरला पुराच्या पाण्याने वेढा घातलेला आहे. येथील जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे. अशातच संरक्षक भींतीवरुन राजकारण करणार्‍या 'लेट-लतीफ' विजय शिवतारेंना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कराड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत फटकारले आहे.

अजित पवार
author img

By

Published : Aug 9, 2019, 6:16 PM IST

सातारा- कराड, सांगली, कोल्हापूरला पुराच्या पाण्याने वेढा घातलेला आहे. येथील जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे. अशातच संरक्षक भींतीवरुन राजकारण करणार्‍या 'लेट-लतीफ' विजय शिवतारेंना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कराड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत फटकारले आहे.

अजित पवार

कराड येथील कृष्णा-कोयना नदीकाठी संरक्षक भिंत उभारण्या संदर्भातील प्रस्तावास आघाडी सरकारमधील तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोध केल्यामुळे भिंतीचे काम रखडले. त्यामुळेच कराडला पुराचा फटका बसल्याचे वक्तव्य जिल्ह्याचे पालकमंत्री विजय शिवतारे यांनी कराडमध्ये केले होते. त्याला प्रत्युत्तर देताना अजित पवार म्हणाले, पालकमंत्री एकतर पूर ओसरल्यानंतर जिल्ह्यात दाखल झाले. त्यांनी पुराच्या संदर्भातील उपाययोजनांवर बोलण्याऐवजी मागची उणीदुणी काढून पालकमंत्र्यांनी अकलेचे तारे तोडले आहेत.

कृष्णा-कोयना नदीकाठी संपूर्ण संरक्षक भिंत उभारण्याच्या प्रस्तावास आघाडी सरकारच्या काळामध्ये मान्यता मिळाली होती. परंतू, संरक्षक भिंत सिमेंटची उभारायची, का जाळीची दगडी भिंत उभारायची याबाबत विचार चालला होता. याठिकाणी सिमेंटची भिंत उभारली तर कायमस्वरुपी येथील पुराचा धोका कमी करण्यासंदर्भातील उपाययोजना करता आल्या असत्या. मात्र, जाळीची दगडी भिंत उभी केली असती तर काही कारणाने भिंतीच्या जाळ्या तुटून नुकसान झाल्याची अनेक उदाहरणे पहायला मिळतात. त्यामुळेच भिंती संदर्भातील विषय रखडला होता. मात्र, पालकमंत्री शिवतारेंनी जिल्ह्याच्या पूर परिस्थिती संदर्भात उपाययोजना करण्याचे सोडून पाठीमागील उणीदुणी बाहेर काढून भीषण पुरातही राजकारण करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप केला.

पुरामुळे कराड व पाटण तालुक्याचे अतोनात नुकसान झाले आहे. लोकांचे स्थलांतर, जीवितहानी, वित्तहानी झाली आहे. यासंदर्भात पालकमंत्र्यांनी खरेतर उपाययोजना करायला हव्या होत्या. परंतू पालकमंत्र्यांनी पूरग्रस्तांच्या भावनेशी खेळ केलेला आहे, असा आरोपही अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत केला.

Intro:सातारा: कराड, सांगली, कोल्हापूरला पुराच्या पाण्याने वेढा घातलेला आहे. येथील जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे. अशातच संरक्षक भींतीवरुन राजकारण करणार्‍या 'लेट-लतीफ' विजय शिवतारेंना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज कराड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत फटकारले.Body:कराड येथील कृष्णा-कोयना नदीकाठी संरक्षक भिंत उभारण्या संदर्भातील प्रस्तावास आघाडी सरकारमधील तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोध केल्यामुळे भिंतीचे काम रखडले. त्यामुळेच कराडला पुराचा फटका बसल्याचे वक्तव्य जिल्ह्याचे पालकमंत्री विजय शिवतारे यांनी कराडमध्ये केले होते. त्याला प्रत्युत्तर देताना अजित पवार म्हणाले, पालकमंत्री एकतर पूर ओसरल्यानंतर जिल्ह्यात दाखल झाले. त्यांनी पुराच्या संदर्भातील उपाययोजनांवर बोलण्याऐवजी मागची उणीदुणी काढून पालकमंत्र्यांनी अकलेचे तारे तोडले आहेत. कृष्णा-कोयना नदीकाठी संपूर्ण संरक्षक भिंत उभारण्याच्या प्रस्तावास आघाडी सरकारच्या काळामध्ये मान्यता मिळाली होती. परंतू संरक्षक भिंत सिमेंटची उभारायची, का जाळीची दगडी भिंत उभारायची याबाबत विचार चालला होता. याठिकाणी सिमेंटची भिंत उभारली तर कायमस्वरुपी येथील पुराचा धोका कमी करण्यासंदर्भातील उपाययोजना करता आल्या असत्या. मात्र जाळीची दगडी भिंत उभी केली असती तर काही कारणाने भिंतीच्या जाळ्या तुटून नुकसान झाल्याची अनेक उदाहरणे पहायला मिळतात. त्यामुळेच भिंती संदर्भातील विषय रखडला होता. मात्र पालकमंत्री शिवतारेंनी जिल्ह्याच्या पूर परिस्थिती संदर्भात उपाययोजना करण्याचे सोडून पाठिमागील उणीदुणी बाहेर काढून भीषण पुरातही राजकारण करण्याचा प्रयत्न केला आहे. पुरामुळे कराड व पाटण तालुक्याचे अतोनात नुकसान झाले आहे. लोकांचे स्थलांतर, जिवितहानी, वित्तहानी झाली आहे. यासंदर्भात पालकमंत्र्यांनी खरेतर उपाययोजना करायला हव्या होत्या. परंतू पालकमंत्र्यांनी पूरग्रस्तांच्या भावनेशी खेळ केलेला आहे, असा आरोपही अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत केला.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.