सातारा- जिल्ह्यातील अनेक भागात सध्या उच्चांकी पाऊस पडला असून सर्वत्र पाणीसाठे पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहेत. काही दुष्काळी तालुक्यातील अनेक छोटे मोठे धबधबे वाहू लागले आहेत. तर, काही भागात पर्यटक देखील येऊ लागले आहेत. अशाताच जिल्ह्यातील अनेक भागांना धुक्याने वेढले आहे. हे दृश्य अतिशय मनमोहक असून नागरिकांना आणि पर्यटकांना नवीन अनुभव घ्यावयास मिळत आहे.
दिपावली सण होऊन गेला तरी देखील थंडीची चाहूल लागली नव्हती. दिपावली दरम्यान खूप थंडी असते. मात्र, यावेळी थंडी ऐवजी चक्क पावसाने मोठी हजेरी लावली होती. पावसाने आता विश्रांती घेतली असून सध्या जिल्ह्यातील काही भागात सकाळी सकाळी पडू लागलेल्या धुक्यानी थंडीची चाहूल दिली आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील डोंगर दऱ्यांमध्ये सध्या दाट धुके पडत असून हा नजारा अल्हाददायक झाला आहे. सकाळी फिरायला जाणारे लोक या परिस्थितीचा आनंद घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर, धुके पडणे म्हणजे पाऊस गेला, असे ग्रामीण भागात समजले जाते. आठ दिवसापासून संपूर्ण जिल्ह्यात पावसाने ओसरी घेतल्याने आता शेतकऱ्यांनी पुन्हा शेतीच्या कामाला सुरूवात केली आहे.
हेही वाचा- उध्दव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत; कऱ्हाडमध्ये शिवसैनिकांकडून होमहवन