सातारा - कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार धैर्यशील कदम व सातारा लोकसभा पोटनिवडणुकीतील महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर येथे झालेल्या प्रचार सभेत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे बोलत होते. यावेळी त्यांनी आपल्या पक्षातील जाहीरनाम्यातील अनेक योजनांचा उच्चार केला. तसेच राज्यात पुन्हा युतीचे सरकार सत्तेवर येईल, असा विश्वासही ठाकरे यांनी व्यक्त केला.
हेही वाचा... आमच्यावर टीका न करता 'त्यांनी' विकासाच्या नावावर मतदान मागावे - खासदार चिखलीकर
महात्मा गांधी मैदानावर जमलेल्या जनतेला संबोधित करताना ठाकरे म्हणाले, 'शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारणाचा मूलमंत्र दिला. या कार्यासाठी लोकांचे आशीर्वाद घायचे असतात, असे त्यांनी सांगितले होते. जनतेचे आशीर्वाद घेण्यासाठी आपण रहिमतपूर येथे आलो आहोत. महायुतीच्या उमेदवारांना मिळणारे मत म्हणजेच जनतेचे आशीर्वाद आपल्याला लाभणार आहेत. तसेच आपण येथे केवळ मत मागायला नव्हे तर नवमहाराष्ट्र घडविण्याचे स्वप्न घेऊन आलो आहोत, असे आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.
हेही वाचा... विकासकामे करून दाखवावी लागतात ती फेकाफेकी करून होत नसतात; जयदत्त क्षीरसागरांचा विरोधकांना टोला
महाराष्ट्र उपाशीपोटी राहायला नाही पाहिजे. त्यासाठी राज्यात ठिकठिकाणी अवघ्या दहा रुपयांमध्ये जेवण देता येतील, अशी 1000 भोजनालये सुरू कराण्याची आमची योजना आहे. यामुळे भुकेलेल्याला अन्न मिळण्याबरोबरच मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीही होणार आहे. युवकांसाठी एक वर्षाची फेलोशिप, उद्योगधंद्यांमध्ये भूमिपुत्रांना 80 टक्के आरक्षण, ग्रामीण विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा करिता अडीच हजार बससेवा सुरू करणार आहोत. शेतकऱ्यांना कर्जमाफी नव्हे तर शंभर टक्के कर्जमुक्त करण्याचे अभिवचन आपण देतो आहोत, असे ठाकरे यावेळी म्हणाले.
हेही वाचा... मानवी साखळीद्वारे चिमुकल्यांनी केली मतदान जनजागृती
आर्थिक दृष्ट्या दुर्बल शेतकऱ्यांना वार्षिक १० हजार रुपये मदत देण्यासाठी आमचे सरकार कटिबद्ध असेल. राज्यातील रस्त्यांची एकूण अवस्था पाहता 50 हजार किलोमीटर लांबीचे बारमाही रस्ते आम्ही बनवणार आहोत. सध्याच्या विजेच्या दरात 30 टक्के कपात केली जाईल. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सुविधा देण्याबरोबरच प्रत्येक जिल्ह्यात एक सुपरस्पेशालीटी हॉस्पिटल उभारणार असल्याची ग्वाही आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिली.
हेही वाचा... भाजपच्या जागा जास्त असल्यामुळे फडणवीसच मुख्यमंत्री होतील- रामदास आठवले
उदयनराजे यांनी आपल्या भाषणात अजित पवार यांच्या आत्मक्लेषाची खिल्ली उडवली. 'शासनाने कृष्णा खोरेची स्थापना करून जिल्ह्यामध्ये पाणी अडवण्याचे मोठे काम केले. परंतु त्यानंतरच्या दहा वर्षात कालव्यांची कामे अपूर्ण राहिली, पुनर्वसनाचा प्रश्न गंभीर बनला, शेतीपर्यंत पाणी पोहोचले नाही. त्याचवेळी आत्मपरिक्षण केले असते तर वेगळे चित्र दिसले असते', असे उदयनराजे यावेळी म्हणाले.
हेही वाचा... माझी लढत थेट जयदत्त क्षीरसागर यांच्याशीच - अशोक हिंगे
धैर्यशील कदम यांनीही आपल्या भाषणात विरोधकांवर जोरदार टीका केली. 'कराड उत्तरच्या निष्क्रिय आमदारांनी गेली दहा वर्षे जनतेला केवळ झुलवत ठेवले. भागातील एकही रस्ता चांगला नाही. २० वर्षे नेतृत्व करत असताना त्यांनी जनतेला केवळ स्वप्न दाखवण्याचे काम केले. अशा लोकप्रतिनिधींना घरी घालवायचे आहे', असे कदम यावेळी म्हणाले.