सातारा - लाकडाच्या वाहतूकीचा परवाना देण्यासाठी 57 हजार 400 रुपयांची लाच घेणारा कोरेगावचा वनपाल व महिला वनरक्षकास गुरुवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. दुपारी वन विभागाच्या सातारा जिल्हा कार्यालयाबाहेर लाचलुचपत विभागाने सापळा रचला होता. वनपाल संदीप प्रकाश जोशी (वय 37, सध्या रा. रहिमतपूर ता.कोरेगाव) आणि वनरक्षक नम्रता भुजबळ (नागझरी ता. कोरेगाव) अशी संशयितांची नावे आहेत.
शेतातील तोडलेल्या 717 झाडांच्या लाकडाच्या वाहतुकीचा परवाना देण्यासाठी वनपालाने लाच मागितली होती. महिला वनरक्षक भुजबळ हिने यातील तक्रारदारास लाच देण्यासाठी उद्युक्त केले असल्याचा आरोप आहे. त्याप्रमाणे रहिमतपूर येथे तक्रारदार साक्षिदारांसह गेला होता. संध्याकाळी सातारा वन भवनात या तेथे भेटू असे त्याने सांगितले. त्यानुसार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने वन भवनाबाहेर सापळा लावला. त्यात तो लाच घेताना बरोबर सापडला. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक अशोक शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक अविनाश जगताप, विनोद राजे, प्रशांत ताटे, संभाजी काटकर, तुषार भोसले, शितल सपकाळ यांनी ही कारवाई यशस्वी केली.
लाच स्वीकारताना वनविभागाच्या दोघांना अटक; परवान्यासाठी मागितले 57 हजार रुपये
शेतातील तोडलेल्या 717 झाडांच्या लाकडाच्या वाहतूकीचा परवाना देण्यासाठी वनपालाने लाच मागितली होती. महिला वनरक्षक भुजबळ हिने यातील तक्रारदारास लाच देण्यासाठी उद्यूक्त केले होते.