ETV Bharat / state

दुर्मिळ खवल्या मांजरासह ६ वन्यजीव तस्करांना अटक - satara scaly cat news

वाई तालुक्यातील वेळे येथे काही युवक खवल्या मांजराची तस्करी करत असल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती. या माहीतीच्या आधारे, वनविभागाच्या भरारी पथकाने शनिवारी पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील एका हॉटेलच्या आवारात सापळा रचुन सहा जणांना अटक केली.

a-gang-of-six-people-arrested-in-case-of-smuggling-of-rare-scaly-cat
दुर्मिळ खवल्या मांजराची तस्करी करणारे सहा अटकेत, कारवाई दरम्यान वनाधिका-यासह पोलीस जखमी
author img

By

Published : Aug 31, 2020, 9:43 AM IST

सातारा - वाई परिसरात दुर्मिळ खवल्या मांजर विकणाऱ्या टोळीला वनविभागाच्या पथकाने अटक केली आहे. वनविभगासह पोलिसांनी संयुक्तरित्या संबंधित कारवाई केली असून खवल्या मांजर व जवळपास एक लाख 25 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे. तर, कारवाई दरम्यान वनाधिका-यासह पोलीस जखमी झाले आहेत.

आकाश चंद्रकांत धडस (वय १९), लक्ष्मण विश्वास धायगुडे (वय २४), विठ्ठल नामदेव भंडलकर (वय २६), महेश दत्तात्रय चव्हाण ( वय २५, सर्व रा. पाडळी ता. खंडाळा), मेहबूब चांदबा विजापूरकर (वय २२) व निखिल युवराज खांडेकर (वय २३, दोघेही रा. रामनगर, वारजे, पुणे) अशी संशयितांची नावे आहेत. या कारवाई दरम्यान त्यांच्याकडून खवले मांजर, ३ मोटार सायकल, ६ मोबाईल व इतर साहित्य असा जवळपास एक लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात केला आहे.

वाई तालुक्यातील वेळे येथे काही युवक खवल्या मांजराची तस्करी करत असल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे, वनविभागाच्या भरारी पथकाने शनिवारी पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील एका हॉटेलच्या आवारात सापळा रचला. काही कर्मचाऱ्यांना बनावट ग्राहक बनवुन पाठवले. दरम्यान, सहा संशयित युवक खवले मांजर घेऊन आले. यावेळी, वनाधिका-यांनी छापा मारुन त्यांच्या मुसक्या आवळल्या. पथकातील कर्मचा-यांनी चार संशयितांना घटनास्थळावरुन जेरबंद केले तर पळून गेलेल्या दोघांना खंडाळा येथुन अटक करण्यात आली.

या कारवाई दरम्यान, पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका संशयिताने वनक्षेत्रपाल सचिन डोंबाळे व पथकातील पोलीस हवालदार राजेश वीरकर यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला असता दोघांना दुखापत झाली. वनक्षेत्रपाल सचिन डोंबाळे, वनपाल गजानन भोसले, वनरक्षक दिपक गायकवाड, विजय भोसले,पोलीस हवालदार राजेश वीरकर, सुहास पवार, दिनेश नेहरकर यांनी यशस्वी वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरोचे रोहन भाटे यांनी सदर कारवाई केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.