ETV Bharat / state

कराडच्या डीवायएसपींसह १७ अधिकारी, ८२ पोलिसांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह - सातारा कोरोना अपडेट

कराड उपविभागातील १७ अधिकारी आणि ८२ पोलीस अशा ९९ जणांची कोरोना रॅपीड टेस्ट निगेटिव्ह आली आहे.

शिरूर पोलीस स्टेशन
शिरूर पोलीस स्टेशन
author img

By

Published : Aug 13, 2020, 3:51 PM IST

कराड (सातारा) - कराड उपविभागातील १७ अधिकारी आणि ८२ पोलीस अशा ९९ जणांची कोरोना रॅपीड टेस्ट निगेटिव्ह आली आहे. यामुळे कराड पोलिसांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांचे मनोधैर्य वाढले आहे. सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या आदेशानुसार ही चाचणी करण्यात आली.

पोलीस दलातील दोन कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच कुटुंबीयांची काळजीही होती. त्यामुळे पोलिसांचे मनोधैर्य खचले होते. गेल्या पाच महिन्यांपासून पोलीस रस्त्यावर आहेत. पोलिसांचे धैर्य खचत चालल्यामुळे पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची कोरोना टेस्ट करण्याचे आदेश दिले. त्यानुसार बुधवारी कराडमध्ये उपविभागातील १७ अधिकारी आणि पन्नासपेक्षा जास्त वय असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची रॅपिड कोरोना टेस्ट करण्यात आली.

स्वतः डीवायएसपी सुरज गुरव यांच्यासह शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील तसेच ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक किशोर धुमाळ यांच्यासह ८२ कर्मचाऱ्यांचा यामध्ये समावेश होता. सर्वांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्याने कराड पोलिसांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कराड उपविभागातील १७ अधिकाऱ्यांसह पन्नास वर्षांवरील ८२ पोलीस कर्मचाऱ्यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्याने पोलिसांच्या मनातील भीती दूर होऊन त्यांचे मनोधैर्य उंचावले आहे. पुढील दोन दिवस उपविभागातील सर्व पोलिसांची कोरोना टेस्ट केली जाणार आहे.
-सुरज गुरव, डीवायएसपी, कराड

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.