ETV Bharat / state

साताऱ्यात आणखी 688 कोरोनाबाधितांची नोंद, संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन घेणार कडक भूमिका - satara corona update

राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वाढत आहे. सातारा जिल्ह्यात शनिवारी 688 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या जिल्ह्यात 4 हजार 538 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहे. कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढवण्याच्या सूचना विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी दिल्या आहे.

जिल्हाधिकारी बैठक
जिल्हाधिकारी बैठक
author img

By

Published : Apr 4, 2021, 6:17 PM IST

Updated : Apr 5, 2021, 12:57 PM IST

सातारा : राज्यात दिवसेंदिवस कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. सातारा जिल्ह्यात शनिवारी 688 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. सध्या जिल्ह्यात 4 हजार 538 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहे. आतापर्यंत 60 हजार 990 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. तर 1 हजार 890 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 67 हजार 427 वर पोहोचली आहे. दरम्यान, कोविड संसर्ग उपाय योजनांसाठी कडक भूमिका प्रशासनाने घ्यावी, अशा सूचना पालकमंत्र्यांसह मान्यवरांनी दिल्या आहे. दररोज मोठ्या संख्येने रुग्ण वाढत असल्याने प्रशासनाची चिंता आणखी वाढली आहे.

कोरोनासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

..तर खासगी डाॅक्टरांवर गुन्हे

सातारा जिल्ह्यात काही दिवसांपासून कोरोनारुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढत आहे. जिल्ह्यातील खासगी डॉक्टर मात्र लक्षणं असूनही इतर उपचार करतात. पर्यायाने रुग्णांमध्ये कोरोना संसर्ग होण्याचा धोका वाढत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे प्रोटोकॉल प्रमाणे खासगी डॉक्टरांनी कोविड उपचार करावेत. तसे न केल्यास जिल्हा प्रशासनाकडून अशा खासगी डॉक्टरांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिला आहे.

गृहराज्यमंत्र्यांच्या पोलीस विभागाला सूचना

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्हा प्रशासनाने जे-जे निर्बंध घातले आहेत, त्या निर्बंधाची जिल्ह्यात प्रभावी अमंलबजावणी करण्याची सूचना गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी केली आहे.

चाचणी लॅबची क्षमता वाढवा - रामराजे

सातारा जिल्ह्यात कोरोना संसर्ग असलेले रुग्ण आढळत आहे. त्यामुळे लावलेले निर्बंध अधिक कडक करावेत. तसेच रुग्णालयातील आरटीपीसीआर लॅबची क्षमता वाढवून कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढवा, अशी सूचना विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केली आहे. कोरोना संसर्गाचे रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढत आहे. रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची कोरोना चाचणी करावी, अशा सूचना पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केली.

हेही वाचा - कोरोनाबाबत सरकारला पूर्ण सहकार्य करू, फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना आश्वासन

Last Updated : Apr 5, 2021, 12:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.