ETV Bharat / state

सातारा जिल्ह्यात आत्महत्येच सत्र सुरुच; आणखी ६ आत्महत्या

रविवारी जिल्ह्यात विविध ठिकाणी पाचजणांनी आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच सोमवारीही जिल्ह्यात आणखी सहाजणांनी आपले जीवन संपवले.

आत्महत्या
आत्महत्या
author img

By

Published : Jun 22, 2021, 10:18 AM IST

सातारा : जिल्ह्यात लाकडाउन शितील होताच आत्महत्येचे सत्र सुरू आहे. रविवारी जिल्ह्यात विविध ठिकाणी पाचजणांनी आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच सोमवारीही जिल्ह्यात आणखी सहाजणांनी आपले जीवन संपवले. कारण वेगवेगळी असली तरी दोन दिवसांत तब्बल ११ जणांनी आत्महत्या केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

कराडमध्ये दोन प्रकार
अक्षय धनंजय भोसले (वय २४, रा. मुक्ताई अपार्टमेंट शुक्रवार पेठ, कराड) याने दि. २० रोजी टेरेसवरील बीमला गळफास घेउन आत्महत्या केली. याची खबर गणेश भोसले (रा. शुक्रवार पेठ, कराड) यांनी पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. त्याच्याही आत्महत्येचे कारण पोलिसांना समजू शकले नाही. दुस-या घटनेत कराड येथील शुभम पदमाकर आडके (वय २४, रा. साई श्रद्धा अपार्टमेंट मुंडे, ता. कराड) याने दि. २० रोजी बेडरूममध्ये फ्रीजवर चढून फॅनच्या हुकाला ओडणीच्या सहायाने गळफास घेतला.

सातारा तालुक्यात दोन प्रकार
तामजाईनगर, सहयोग काॅलनीत राहणाऱ्या डाॅ. कविता विश्वासराव भंडारे (वय ५९) यांनी दि.२० रोजी सकाळी आठच्या सुमारास राहत्या घरी सिलींग फॅनला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. कारण अद्याप अस्पष्ट आहे. याबाबत अरूण ठोके (रिमांड होमसमोर, सदर बझार सातारा) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. सातारा तालुक्यातील शेळकेवाडी येथे चौथा प्रकार घडला. बाळू पांडू पवार (वय ५५, मूळ रा. विजापूर, कर्नाटक, सध्या रा. शेंद्रे, ता. सातारा) यांनी दि. २० रोजी सकाळी नऊच्या सुमारास शेळकेवाडी येथील एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याची खबर अशोक राठोड (वय ३५, रा. विजापूर, कर्नाटक) यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात दिली आहे.

वाई-फलटणमध्येही नोंद
वाई तालुक्यातील भूईंज कदमवाडी येथे घडली. अभिजित भिकू कदम (वय २७, रा. कदमवाडी, ओझर्डे, ता. वाई) याने दि. १९ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास राहत्या घरात पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. सहावी घटना फलटण येथे घडली. जयसिंग गुलाबराव जगताप (वय ७०, रा. चिंचवण, माळेगाव, काॅलनी माळेगाव बुद्रुक, पुणे) यांनी विषारी पिऊन आत्महत्या केली. याबाबत हणमंत धुळाजी सोनवलकर (वय ५०, पोलीस पाटील दुधेबावी, ता. फलटण) यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. एकापाठोपाठ एक अशा आत्महत्या होऊ लागल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.