सातारा - जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ दिसत असून गेल्या तीन दिवसांत बाधितांच्या रोजच्या आकड्याने शंभरी ओलांडली आहे. गेल्या 24 तासांत जिल्ह्यात 189 संशयित बाधित निष्पन्न ( 5 January Satara Corona Update ) झाले. मागील आठ दिवसात जिल्ह्याचा बाधितांचा दर पाच पट वाढला आहे.
बाधितांचा दर 4.80
जिल्हा आरोग्य यंत्रणेने जिल्हा माहिती कार्यालयाद्वारे याबाबतची आकडेवारी प्रसिद्धीस दिली आहे. या आकडेवारीनुसार गेल्या 24 तासांत जिल्ह्यात एकूण 3 हजार 936 नमूने घेण्यात आले. त्यापैकी 189 जणांचे अहवाल बाधित आले ( 189 New Corona Patients ) आहेत. आजचा जिल्ह्याचा बाधितांचा दर 4.80 इतका ( Corona Positivity Rate Increase in Satara ) आहे.
तीन दिवसांत लक्षणीय वाढ
जिल्ह्यात 15 ते 18 वयोगटातील लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी आता शाळांमधे लसीकरण मोहिमेने वेग घेतला आहे. तिसरी लाट आल्याच्या चर्चा सुरू असतानाच बुधवारी (दि. 5 जानेवारी) आलेल्या अहवालात 189 रूग्ण बाधित आढळले आहेत. नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यातील हा सर्वात मोठा आकडा असून बाधितांचा दर 4.80 वर पोहोचला आहे. 20 डिसेंबर रोजीच्या अहवालात 12 लोक बाधित आढळले होते. बाधितांचा दर 0.60 इतका कमी होता. त्यानंतरचा आठवडाभर 15 ते 20 दरम्यान रोज बाधित निष्पन्न होत होते. तथापि गेल्या तीन दिवसात म्हणजे रविवारी 65, सोमवारी 63, मंगळवारी 98 व आज 189 इतके बाधित आढळले आहेत.
जिल्ह्यात आजअखेर
नमुने - 23 लाख 83 हजार 821
बाधित - 2 लाख 52 हजार 746
मृत्यू - 6 हजार 499
कोरोनामुक्त -2 लाख 45 हजार 25