ETV Bharat / state

कराड नगरपालिकेतील २३ नगरसेवकांचा पृथ्वीराज चव्हाणांना धक्का.. डॉ.अतुल भोसलेंना पाठिंबा - Rajendra Singh Yadav press conference

माजी उपनगराध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक राजेंद्रसिंह यादव यांनी कराड दक्षिणमधील भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार डॉ.अतुल भोसले यांना आपले समर्थन जाहीर केले आहे. पत्रकार परिषद आयोजित करून राजेंद्रसिंह यादव यांनी यादव गटासह आपल्या समर्थक ११ नगरसेवकांचा पाठिंबा भोसले यांना देण्याचे जाहीर केले.

पत्रपरिषदेचे दृश्य
author img

By

Published : Oct 6, 2019, 3:21 PM IST

सातारा- कराड नगरपालिकेतील यशवंत विकास आघाडीचे नेते, माजी उपनगराध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक राजेंद्रसिंह यादव यांनी कराड दक्षिणमधील भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार डॉ. अतुल भोसले यांना आपले समर्थन जाहीर केले आहे. पत्रकार परिषद आयोजित करून राजेंद्रसिंह यादव यांनी यादव गटासह आपल्या समर्थक ११ नगरसेवकांचा पाठिंबा भोसले यांना देण्याचे जाहीर केले. यावेळी भाजपचे उमेदवार डॉ. अतुल भोसले उपस्थित होते.

डॉ. अतुल भोसले यांना आपले समर्थन जाहीर करतांना विद्यमान नगरसेवक राजेंद्रसिंह यादव

डॉ. अतुल भोसले यांना पाठिंबा दिलेल्या नगरसेवकांची संख्या २३ इतकी झाली आहे. त्यापैकी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे या भाजपच्या चिन्हावर थेट जनतेतून निवडून आल्या आहेत. त्यांना डॉ. भोसले यांनीच भाजपचा उमेदवार म्हणून नगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरविले होते. तसेच उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांचाही पाठिंबा देणार्‍या नगरसेवकांमध्ये समावेश आहे.

विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर कराड दक्षिणमध्ये बर्‍याच राजकीय उलथापालथी झाल्या. माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे आमदार यांचे खंदे समर्थक आमदार आनंदराव पाटील यांनीही काँग्रेसचा हात सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. तसेच कराड शहर आणि कराड दक्षिण मतदार संघातील काही भागात प्रभाव असणारे नगरसेवक राजेंद्रसिंह यादव यांनीही निर्धार मेळावा घेऊन भूमिका जाहीर करणार असल्याची घोषणा केली होती.

हेही वाचा- पाटण विधानसभा मतदारसंघातील सर्वच उमेदवारांचे अर्ज वैध

तसेच यादव हे श्री. छत्रपती उदयनराजे भोसले यांचे कट्टर समर्थक आहे. आणि उदयनराजेंनी भाजप प्रवेश केल्याने ते सातारा पोटनिवडणुकीतील भाजपचे उमेदवार झाले आहे. त्यामुळे यादव गट भाजपलाच सहकार्य करणार, हे नक्की होते. फक्त घोषणेची औपचारिकताच बाकी होती. शनिवारी पत्रकार परिषद घेऊन राजेंद्रसिंह यादव गटाने आपल्या समर्थक ११ नगरसेवकांसह सातारा पोटनिवडणुकीतील भाजप उमेदवार श्री. छ. उदयनराजे भोसले आणि कराड दक्षिणचे उमेदवार डॉ. अतुल भोसले यांना पाठिंबा जाहीर करून राजकीय भूमिका स्पष्ट केली.

हेही वाचा- साताऱ्यातील आठ विधानसभा मतदारसंघातून 108 उमेदवारी अर्ज वैध

Intro:सातारा: कराड नगरपालिकेतील यशवंत विकास आघाडीचे नेते, माजी उपनगराध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक राजेंद्रसिंह यादव यांनी पत्रकार परिषद आयोजित करून कराड दक्षिणमधील भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार डॉ. अतुल भोसले यांना यादव गटासह आपल्या समर्थक 11 नगरसेवकांचा पाठिंबा जाहीर केला. यावेळी भाजपचे उमेदवार डॉ. अतुल भोसले उपस्थित होते.
Body:डॉ. अतुल भोसले यांना पाठिंबा दिलेल्या नगरसेवकांची संख्या 23 इतकी झाली आहे. त्यापैकी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे या भाजपच्या चिन्हावर थेट जनतेतून निवडून आलेल्या आहेत. त्यांना डॉ. भोसले यांनीच भाजपच्या उमेदवार म्हणून नगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरविले होते. तसेच उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांचाही पाठिंबा देणार्‍या नगरसेवकांमध्ये समावेश आहे. विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर कराड दक्षिणमध्ये बर्‍याच राजकीय उलथापालथी झाल्या. माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे आमदार यांचे खंदे समर्थक आ. आनंदराव पाटील यांनीही काँग्रेसचा हात सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. तसेच कराड शहर आणि कराड दक्षिण मतदार संघातील काही भागात प्रभाव असणार्‍या नगरसेवक राजेंद्रसिंह यादव यांनीही निर्धार मेळावा घेऊन भूमिका जाहीर करणार असल्याची घोषणा केली होती. तसेच यादव हे श्री. छ. उदयनराजे भोसले यांचे कट्टर समर्थक असल्याने आणि उदयनराजेंनी भाजप प्रवेश करून सातारा पोटनिवडणुकीतील भाजपचे उमेदवार झाल्यामुळे यादव गट भाजपलाच सहकार्य करणार, हे नक्की होते. फक्त घोषणेची औपचारिकताच बाकी होती. शनिवारी पत्रकार परिषद घेऊन राजेंद्रसिंह यादव गटाने आपल्या समर्थक 11 नगरसेवकांसह सातारा पोटनिवडणुकीतील भाजप उमेदवार श्री. छ. उदयनराजे भोसले आणि कराड दक्षिणचे उमेदवार डॉ. अतुल भोसले यांना पाठिंबा जाहीर करून राजकीय भूमिका स्पष्ट केली.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.