ETV Bharat / state

कोयना धरणात ८० टीएमसी पाणी; पाणीपातळी नियंत्रणासाठी उद्या २१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात ११ ऑगस्टपासून सलग आणि चांगला पाऊस झाला आहे. पावसाचा जोर पाहता धरणातील पाणीपातळी नियंत्रित नियंत्रित करण्यासाठी उद्या (शुक्रवार) सकाळी ११ वाजता पायथा वीजगृह कार्यान्वित करून २१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात केला जाणार आहे.

कोयनेचा पाणीसाठा ८० टीएमसी
कोयनेचा पाणीसाठा ८० टीएमसी
author img

By

Published : Aug 13, 2020, 10:57 PM IST

सातारा : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पर्जन्यवृष्टी सुरू असून गुरुवारी रात्री ८ वाजेपर्यंत धरणातील पाणीसाठा ८०.४५ टीएमसी एवढा झाला आहे. पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी शुक्रवारी १४ ऑगस्टरोजी सकाळी ११ वाजता कोयना धरणाच्या पायथा वीजगृहातून २१०० क्युसेक क्षमतेने कोयना नदीपात्रात पाणी सोडले जाणार असल्याची माहिती कोयना धरण विभागाचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील यांनी दिली.

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात ११ ऑगस्टपासून सलग आणि चांगला पाऊस झाला आहे. सध्याही पावसाचा जोर सुरुच आहे. त्यामुळे बुधवारी रात्री ८ वाजता कोयना धरणातील पाणीसाठा ८०.४५ टीएमसी आणि पाणी पातळी २१४१.८ इंच झाली आहे. पावसाचा जोर पाहता धरणातील पाणीपातळी नियंत्रित नियंत्रित करण्यासाठी उद्या (शुक्रवार) सकाळी ११ वाजता पायथा वीजगृह कार्यान्वित करून २१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात केला जाणार आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास धरणाचे दरवाजे उघडून विसर्ग करावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोयना-कृष्णा नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे. नागरिकांनी नदीपात्रात जाऊ नये, असा इशाराही कोयना धरण व्यवस्थापनाने दिला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.