सातारा - राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असताना सातारा जिल्ह्याचा आकडा मात्र वाढत आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 2 हजार 648 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहे. तर 31 बाधितांचा मृत्यू झाला आहे.
खटावमध्ये रुग्णांचा वाढता आकडा
जावली 47, कराड 182, खंडाळा 362, खटाव 566, कोरेगाव 212, माण 207, महाबळेश्वर 39, पाटण 109, फलटण 515, सातारा 311, वाई 84 व इतर 14 असे तालुकानिहाय 2 हजार 648 नवे रुग्ण आढळले. आजपर्यंत एकूण 1 लाख 51 हजार 387 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आढळले आहेत. विविध ठिकाणी 19 हजार 146 रुग्ण उपचार घेत आहेत. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. अनिरुद्ध आठल्ये यांनी दिली.
खटाव-साताऱ्यात अधिक मृत्यू
मृत्यू झालेल्या 31 जणांमध्ये जावली 5, कराड 3, खटाव 8, कोरेगाव 4, फलटण 1, सातारा 7, वाई तालुक्यातील तिघांचा समावेश आहे. आजपर्यंत जिल्ह्यामध्ये एकूण 3 हजार 456 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
2 हजार 142 जणांना डिस्चार्ज
जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या 2 हजार 142 नागरिकांना आज संध्याकाळपर्यंत घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
हेही वाचा - देशात 40 दिवसानंतर नवीन कोरोनाबाधितांचा आकडा 2.5 लाखांपेक्षा कमी; 2.22 लाख नवे रुग्ण