सातारा - जिल्ह्यात 24 तासांत 2 हजार 383 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले असून 34 रुग्णांचा मृत्यू झाला, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे.
तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या
जावली 117, कराड 309, खंडाळा 209, खटाव 145, कोरेगाव 273, माण 123, महाबळेश्वर 25, पाटण 71, फलटण 406, सातारा 515, वाई 165 व इतर 25 असे एकूण 2 हजार 383 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहे.
सातारा-वाई-कराडात मृत्यू अधिक
सातारा 9, वाई 8, कराड 7, फलटण व खटाव प्रत्येकी 3, कोरेगाव-महाबळेश्वर-पाटण व जावली प्रत्येकी 1 असे जिल्ह्यातील 34 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात कोरोनाचे थैमान सुरूच
राज्यात कोरोनाचे थैमान सुरूच आहे. राज्यात गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 62 हजार 919 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे, तर उपचारादरम्यान 828 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात मृत्यूदर 1.5% इतका आहे. राज्यात 24 तासात 69 हजार 710 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. असे असले तरी मृतांच्या संख्येत होणारी वाढ प्रशासनाच्या चिंतेत वाढ घालणारी आहे.
हेही वाचा - 18 ते 44 वर्षे वयोगटासाठी रविवारपासून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण होणार सुरू; यंत्रणा सज्ज