ETV Bharat / state

संगमनगर-घाटमाथा रस्त्यासाठी 16 कोटी 85 लाखांचा निधी मंजूर - खासदार श्रीनिवास पाटील

गुहागर- विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील संगमनगर ते घाटमाथ्यापर्यंतच्या 13 कि. मी. रस्त्याच्या डांबरीकरणासाठी 16 कोटी 85 लाखाचा निधी मंजूर झाला आहे. या रस्त्याच्या निधीसाठी खासदार श्रीनिवास पाटील यांनी पाठपुरावा केला होता.

85 lakh sanctioned
85 lakh sanctioned
author img

By

Published : Apr 5, 2021, 4:57 PM IST

कराड (सातारा) - गुहागर- विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील संगमनगर ते घाटमाथ्यापर्यंतच्या 13 कि. मी. रस्त्याच्या डांबरीकरणासाठी 16 कोटी 85 लाखाचा निधी मंजूर झाला आहे. या रस्त्याच्या निधीसाठी खासदार श्रीनिवास पाटील यांनी पाठपुरावा केला होता.

कराड-चिपळूण-गुहागर महामार्गावर पाटण तालुक्यातील संगमनगर ते घाटमाथा या 13 कि. मी. अंतराच्या कामासाठी 16.85 कोटींच्या निधीची तरतूद करण्याची मागणी खासदार श्रीनिवास पाटील यांनी केली होती. कराड-पाटण मार्ग हा कोकणचे प्रवेशद्वार आहे. कोकणात ये-जा करणार्‍या वाहनांची संख्याही मोठी आहे. पाटण तालुक्यात जादा पाऊस पडतो. त्यामुळे या मार्गावर खड्डे पडून रस्त्याची दुर्दशा होते. कोयना विभागासह डोंगरी भागातील लोकांना या मार्गावरून पावसाळ्यात प्रवास करणे अडचणीचे ठरते. तसेच रस्त्याच्या दुरावस्थेमुळे कोकणात जाणार्‍या नागरिकांना प्रवासात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, या बाबी खासदार पाटील यांनी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या.

85 lakh sanctioned
नितीन गडकरी यांनी केलेले ट्विट

माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी देखील या रस्त्याच्या कामाबाबत खा. पाटील यांच्याशी पत्रव्यवहार केला होता. तसेच संगमनगर, गोषटवाडी, राम मळा, दास्तान, रासाटी, कोयनानगर, हेळवाक, शिवंदेश्वर, नेचल, बोपोली आणि घाटमाथ्यावरील ग्रामस्थांनीही खासदार श्रीनिवास पाटील यांच्याकडे रस्त्याबाबत व्यथा मांडली होती. त्यानुसार खासदार श्रीनिवास पाटील यांनी राष्ट्रीय महामार्गाचे कोल्हापूर विभाग कार्यकारी अभियंता संजय सागावकर यांना पत्रव्यवहार केला होता. लोकसभा अधिवेशन काळात केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन संगमनगर-घाटमाथा रस्त्याच्या कामासाठी निधीची तरतूद करण्याची मागणी केली होती.

खासदार पाटील यांच्या मागणीनुसार नितीन गडकरी यांनी 16 कोटी 85 लाखांचा निधी मंजूर केला आहे. या रस्स्त्याच्या कामानंतर कोयनानगर ते घाटमाथा परिसरातील दळणवळण सुकर होणार आहे. तसेच विजापूर-गुहागर राष्ट्रीय महामार्गाचा दर्जाही सुधारणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.