सातारा - सातारा जिल्ह्यात कोमॉर्बिड सर्व्हेक्षणांतर्गत कोविड-19 सदृष्य लक्षणे असलेले 1 हजार 936 रुग्ण आढळून आले. या नागरिकांच्या आरोग्यावर, आरोग्य यंत्रणेने लक्ष केंद्रीत केले असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी दिली. आशाताई-अंगणवाडी सेविकांनी सर्वे केला असून, जिल्ह्यातील 1 हजार 497 ग्रामपंचायतींमध्ये सेविकांच्यामार्फत दररोज केल्या जाणाऱ्या सर्व्हेक्षणांत ही माहिती पुढे आली आहे. सातारा जिल्ह्यात आशा व अंगणवाडी सेविका यांच्या माध्यमातून दररोज 25 ते 40 व्याधीग्रस्त नागरिकांचा सर्व्हे केला जात असून, यामध्ये विविध लक्षण असणारे नागरिक व 94 पेक्षा कमी ऑक्सिजन असणाऱ्या नागरिकांना शोधून त्यांची प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत तात्काळ कोविड टेस्ट केली जात आहे.
खटाव तालुक्यात सर्वाधिक बाधित
गेल्या आठवड्यात झालेल्या सर्वेनुसार खटाव तालुक्यात सर्वाधिक 394 कोरोना बाधित रुग्ण आढळले. या सर्व्हेमुळे लवकर निदान झाले, त्या सर्वांवर योग्य वेळी उपचार सुरु झाले आहेत. तालुकानिहाय ग्रामपंचायती सर्वेक्षणातील नागरिकांची संख्या व त्यापैकी कोरोनाबाधित रुग्ण पुढील प्रमाणे सातारा 195 ग्रामपंचायती 7 हजार 38 नागरिक 299 कोरोना बाधित, कोरेगाव 142 ग्रामपंचायती 4 हजार 294 नागरिक- 211 बाधित , खटाव 134 ग्रामपंचायती 4 हजार 911 नागरिक- 394 बाधित, माण 95 ग्रामपंचायती 3 हजार 118 नागरिक- 300 बाधित, फलटण 131 ग्रामपंचायती 5 हजार 860 नागरिक 132 बाधित खंडाळा 63 ग्रामपंचायती 150 नागरिक 17 बाधित, वाई 99 ग्रामपंचायती 3 हजार 72 नागरिक 54 बाधित, जावली 125 ग्रामपंचायती 4 हजार 193 नागरिक 100 बाधित, महाबळेश्वर 79 ग्रामपंचायती 905 नागरिक 19 बाधित, कराड 200 ग्रामपंचायती 4 हजार 933 नागरिक 323 बाधित, पाटण 234 ग्रामपंचायती 393 नागरिक 87 बाधित, अशी एकूण बाधितांची संख्या आहे.हेही वाचा- जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी ग्रामीण भागात कोविडविषयी जनजागृती करावी - सुनील केदार