सांगली - गॅस दरवाढ आंदोलनादरम्यान युवक काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापटीचा प्रकार घडला आहे. केंद्र सरकारच्या गॅस दरवाढीच्या निषेधार्थ युवक काँग्रेसकडून करण्यात आलेल्या आंदोलनावेळी हा प्रकार घडला. यावेळी काँग्रेसच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
केंद्र सरकारच्या गॅस व इंधन दरवाढीच्या निषेधार्थ सांगली युवक काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले आहे. शहरातील काँग्रेस कमिटीसमोर अखिल भारतीय युवक काँग्रेसचे महासचिव हरपाल सिंह, महाराष्ट्र युवक काँग्रेस सचिव जयदीप शिंदे व सांगली जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारविरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली.
यावेळी आक्रमक काँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरत निषेध करण्याचा प्रयत्न केला असता, पोलिसांनी त्यांना रोखले. यावेळी युवक काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये जोरदार झटापट झाली. यानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. यावेळी आंदोलकांनी पोलिसांच्या दडपशाही व केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
हेही वाचा -
राज्यसभेत देशातील कोरोना संसर्गावर चर्चा, आरोग्य मंत्री म्हणाले...
दिल्ली हिंसाचारातील शाहरुखचा थाट..! ४ गर्लफ्रेंड.. शाही पार्ट्या अन् जिमचे फॅड