ETV Bharat / state

धक्कादायक! मळणी मशीनमध्ये साडीचा पदर अडकून महिला ठार

करंजे येथील मदने मळा येथे सुभद्रा विलास मदने या शेतात गव्हाच्या मळणीचे काम करत होत्या. यावेळी त्यांची साडी मळणी मशिनमध्ये गेल्याने त्या मशीनमध्ये ओढल्या गेल्या.

threshing machine in Sangli
मळणी मशीनमध्ये अडकून महिला ठार
author img

By

Published : Mar 11, 2021, 7:55 PM IST

सांगली - मळणी मशीनमध्ये साडीचा पदर अडकल्याने महिलेचा मशिनमध्ये चिरडून मृत्यू झाला आहे. सुभद्रा विलास मदने (वय 50) असे या ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. खानापूरच्या करंजे येथे ही घटना घडली आहे.

खानापूर तालुक्यातील करंजे येथे मळणी मशीनमध्ये साडी अडकून महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. करंजे येथील मदने मळा येथे सुभद्रा विलास मदने या शेतात गव्हाच्या मळणीचे काम करत होत्या. यावेळी त्यांची साडी मळणी मशिनमध्ये गेल्याने त्या मशीनमध्ये ओढल्या गेल्या. यामध्ये त्यांचे अर्धे शरीर जावून कापले गेले. यावेळी अपघातात सुभद्रा यांच्या शरीराचे तुकडे होऊन त्यांचा मृत्यू झाला.

हेही वाचा-'खलनायकही ताकदीचा लागतो! पुढील साडेतीन वर्ष विरोधकांनी अशीच भूमिका साकारावी'

घटनेची माहिती मिळताच विटा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी करंजे ग्रामीण रुगणालयात पाठविला. या घडलेल्या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

हेही वाचा-मुख्यमंत्र्यानी कणा दाखवून एमपीएससी परीक्षा घ्याव्यात - प्रकाश आंबेडकर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.