सांगली - चारित्र्याचा संशयावरुन पतीने चाकूने भोकसून पत्नीचा खून केल्याची घटना घडली. मिरजेमध्ये घडलेल्या या घटनेदरम्यान एक जण जखमी झाला आहे. यानंतर हल्लेखोर पती पसार झाला असून मिरज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सोनम राहुल माने (वय 18) असे या विवाहितेचे नाव आहे.
हेही वाचा- पुण्यात मेट्रोपेक्षा वॉटर ट्रान्सपोर्ट प्रकल्प महत्वाचा - प्रकाश आंबेडकर
मिरजेच्या रेल्वे स्टेशन येथील प्रताप कॉलनी येथे राहुल माने हा आपल्या पत्नीसोबत राहत होता. एक वर्षांपूर्वी या दोघांचा प्रेम विवाह झाला होता. सोनम ही राहुल याच्या मावशीची मुलगी आहे. लग्नानंतर राहुल हा पत्नी सोनम हिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यामुळे त्याच्यात वारंवार वाद होत होते.
झटापटीत राजू अच्युधन जखमी
मंगळवारी मध्यरात्री राहुल याने झोपलेल्या सोनमच्या पोटात चाकू भोसकला. सोनमने आरडा-ओरडा सुरू केला. यावेळी शेजारी राहणाऱ्या तरुणांनी सोनम हिच्या घरी धाव घेतली. यावेळी पळून जाणाऱ्या राहुल माने याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, राहुल माने पळून जाण्याचा यशस्वी झाला. या झटापटीत राजू अच्युधन या तरुणाच्या हाताला चाकू लागल्याने तो जखमी झाला आहे. तातडीने जखमी झालेल्या सोनमला उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान सोनमचा मृत्यू झाला. याप्रकरणी मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.