ETV Bharat / state

शिराळा खुर्द ग्रामस्थांची माणुसकी; पोलिसाच्या वडिलांची सेवा करण्यासाठी सरसावले - सांगली पोलीस बातमी

एकीकडे वडिलांची ही अवस्था व दुसरीकडे आपले कर्तव्य यावेळी गणेश यांनी आपल्या कर्तव्याला प्राधान्य देऊन जड अंतः करणाने वडिलांंचा डॉक्टरांच्या सल्ल्याने डिस्चार्ज करून घेतला.

शिराळा खुर्द ग्रामस्थांची माणुसकी; पोलिसाच्या वडिलांची सेवा करण्यासाठी सरसावले
author img

By

Published : May 10, 2020, 4:31 PM IST

सांगली - कोरोना विषाणुचा मुकाबला करण्यासाठी देशातील पोलीस यंत्रणा प्रामुख्याने पुढे आहे. आपल्या कुटुंबाची काळजी न करता देशाची सेवा पोलीस कर्मचारी करत आहेत. आपले कर्तव्य चोख बजावत आहेत. परंतु अनेकांच्या गावाकडे आजारी वयोवृद्ध जन्मदाते आई वडील आहेत. त्यांच्याकडे पाहण्यासाठी कोणीही नाही. अशी अनेक उदाहरणे आहेत. अशीच कहाणी आहे. शिराळा तालुक्यातील शिराळेखुर्द या छोट्याशा गावातील ठाणे मुंबई येथे पोलीस दलात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत असणाऱ्या गणेश पाटील या जवानाची.

पोलीस शिपाई ठाणे ग्रामीण पोलीस दलात कर्तव्य बजावत आहेत. दिनांक ९ मार्च रोजी गणेश यांच्या वडिलांना ह्रदयविकाचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना इस्लामपूर येथील शुश्रूषा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. पण यावेळी डोक्यामध्ये रक्तस्राव झाल्याने ते कोमात गेले. उपचारांना प्रतिसाद देत नाहीत हे लक्षात येताच सरस्वती मेडीको अँपल येथे दाखल केले. त्या ठिकाणी दहा दिवस उपचार केले असता त्यांना स्पष्टपणे सांगण्यात आले की कमीत कमी एक वर्ष लागेल पूर्ण बरे होण्यासाठी. अशातच गणेश पाटील यांना पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण यांचा कोव्हिड-१९ च्या बंदोबस्ताकरीता कर्तव्यावर हजर राहण्याचा आदेश आला. एकीकडे वडीलांची ही अवस्था व दुसरीकडे आपले कर्तव्य यावेळी गणेश यांनी आपल्या कर्तव्याला प्राधान्य देऊन जड अंतःकरणाने वडिलांंचा डॉक्टरांच्या सल्ल्याने डिस्चार्ज करून घेतला.

घरी वडिलांची काळजी घेणारे गणेश यांच्याशिवाय कोणीही नाही. आईचेही दोनच महिन्यापूर्वी पोटाचे ऑपरेशन झाले आहे. असे असतानाही आईने त्यांना कर्तव्यावर जाण्यासाठी प्रेरित केले आणि ते लगेच कर्तव्यावर हजरही झाले. पण गणेश यांचे वडील सदाशिव दादा पाटील सेवानिवृत्त शिक्षक गावात पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तर गावकऱ्यांच्या पाचवीला पुजलेला या गंभीर परिस्थितीमध्ये सदाशिव यांनी आपल्या घरातील कुपनलिकेचा पाणीपुरवठा करून संपूर्ण गावाला पाच वर्षे खूप सहकार्य केले होते. यावेळी गावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी अशा समाजसेवकास व ज्यांचा मुलगा अशा कठीण परिस्थितीत आपल्या आईवडिलांपेक्षाही आपले कर्तव्य श्रेष्ठ मानतो. याचा विचार करून गावातील युवकांनी एकत्र येऊन गणेश यांच्या वडिलांची सेवा करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यांची दैनंदिन शुश्रूषा, औषधे, साफ सफाई, ही सर्व कामे गावातील युवक हरी पावले, श्रीधर पाटील, दीपक पाटील, दत्ताजीराव आंधळकर, अरूण पाटील, संदीप पाटील हे खूप चांगली सेवा करत आहेत. त्याबद्दल त्यांचा सदैव ऋणी राहीन, असे भावनिक मत गणेश पाटील यांनी व्यक्त केले.

२०१६ सालापासून माझ्या वडिलांना अर्धांगवायुचा विकार आहे. चार दिवसांपूर्वी त्यांना पुन्हा एकदा फिट आली होती. हे मला फोनवरून समजले. पण आईला त्यांना दवाखान्यात घेऊन जाता आले नाही. एकीकडे वयोवृद्ध आईवडील तर दुसरीकडे देशसेवेचे कर्तव्य, अशा कठीण परिस्थितीत मला माझे कर्तव्यच श्रेष्ठ वाटते. नीतेश राणे यांचे स्वीय सहाय्यक यांचा फोन आला होता. उपचारासाठी काही मदत हवी आहे का म्हणूनही विचारले. परंतु गावामधील सामाजिक कार्यकर्ते माझ्या वडिलांची काळजी घेत आहेत. तसेच तेथील प्रशासनाने व संघटनांनीही लक्ष देणे अतिशय गरजेचे आहे, असेही गणेश पाटील म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.