ETV Bharat / state

ज्येष्ठ साहित्यिक डॉ. साळुंखेंच्या पंचाहत्तरी निमित्त सांगलीत भव्य विचार रॅली - सांगली

सांगली जिल्ह्याचे सुपुत्र आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या पंचाहत्तरी निमित्त सांगलीतील विविध पुरोगामी आणि सामाजिक संघटनांच्यावतीने या अमृत महोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

साळुंखेंच्या पंचाहत्तरी निमित्त सांगलीत भव्य विचार रॅली
author img

By

Published : Jun 30, 2019, 4:29 PM IST

सांगली - ज्येष्ठ साहित्यिक डॉ. आ.ह. साळुंखे यांच्या पंचाहत्तरी निमित्त सांगलीत आज जाहीर सत्कार सोहळा पार पडला. या पार्श्वभूमीवर सांगली शहरातून भव्य 'विचार रॅली' काढण्यात आली. विविध पुरोगामी आणि सामाजिक संघटनांच्यावतीने या जाहीर सत्काराचे आयोजन करण्यात आले.

सांगली जिल्ह्याचे सुपुत्र आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या पंचाहत्तरी निमित्त सांगलीतील विविध पुरोगामी आणि सामाजिक संघटनांच्यावतीने या अमृत महोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या जाहीर सत्काराच्या पार्श्वभूमीवर शहरातून भव्य विचार रॅली काढण्यात आली. या रॅलीत साळुंखे लिखित ६४ पुस्तकांचे डिजिटल फलक, चित्र रथ तसेच बळीराजा, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले यांच्या वेशभूषेत सहभागी झालेले कलाकार यांच्यामुळे ही रॅली लक्षवेधी ठरली.

साळुंखेंच्या पंचाहत्तरी निमित्त सांगलीत भव्य विचार रॅली

पारंपरिक वेशभूषा परिधान करून महिलाही दुचाकीवरून या रॅलीत सहभागी झाल्या होत्या. शहरातील प्रमुख मार्गावरून ही भव्य रॅली निघाली. यावेळी जिल्ह्यातील सामजिक कार्यकर्ते, पुरोगामी नेते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Intro:सरफराज सनदी - सांगली.

AV

Feed SEND - FILE NAME - MH_SNG_SATKAR_RYALLI_30_JUNE_2019_VIS_1_7203751 - TO - MH_SNG_SATKAR_RYALLI_30_JUNE_2019_VIS_3_7203751

स्लग - जेष्ठ साहित्यीक डॉ.आ.ह.साळुंखे यांच्या पंचाहत्तरी निमित्त निघाली भव्य विचार रॅली ..

अँकर - जेष्ठ साहित्यीक डॉ.आ.ह. साळुंखे यांच्या पंचाहत्तरी निमित्त सांगलीत आज जाहीर सत्कार सोहळा संपन्न होत आहे.या पार्श्वभूमीवर सांगली शहरातून भव्य 'विचार 'रॅली काढण्यात आली आहे.विविध पुरोगामी आणि सामाजिक संघटनांच्यावतीने या जाहीर सत्काराचे आयोजन करण्यात आले.Body:सांगली जिल्ह्याचे सुपुत्र व जेष्ठ साहित्यीक डॉ.आ.ह. साळुंखे यांच्या पंचाहत्तरी निमित्त सांगलीतील विविध पुरोगामी आणि सामाजिक संघटनांच्यावतीने या अमृत महोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.या जाहीर सत्काराच्या पार्श्वभूमीवर शहरातून भव्य विचार रॅली काढण्यात आली. या रॅलीत साळुंखे लिखित ६४ पुस्तकांचे डिजिटल फलक ,चित्र रथ,तसेच बळीराजा ,छत्रपती शिवाजी महाराज,शाहू महाराज,बाबासाहेब आंबेडकर ,महात्मा जोतिबा फुले,यांच्या वेशभूषात सहभागी झालेले कलाकार यांच्यामुळे ही रॅली लक्षवेधी ठरली,त्याच बरोबर पारंपरिक वेशभूषा परिधान करून महिलाही दुचाकीवरून सहभागी झाल्या होत्या.शहरातील प्रमुख मार्गावरून ही भव्य रॅली निघाली.यावेळी जिल्ह्यातील सामजिक कार्यकर्ते, पुरोगामी नेते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.शांतिनिकेतन विद्यालयाच्या परिसरात आ.ह.साळुंखे यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत जाहीर सत्कार संपन्न होणार आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.