ETV Bharat / state

अंधश्रद्धेतून चुलत्याचा खून, सांगलीच्या कांदे येथील घटना

author img

By

Published : Apr 29, 2020, 6:12 PM IST

चुलत काकाने आपल्या घराच्या नावाने देव उठवलाय आणि त्यामुळेच आपल्या घरात भांडणे होत आहेत, अशा अंधश्रद्धेतून पुतण्याने काकाचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार शिराळा तालुक्यातील कांदे गावात घडला आहे.

Uncle killed by nefew because of superstition in kande village of sangli district
अंधश्रद्धेतून चुलत्याचा खून, सांगलीच्या कांदे येथील घटना

सांगली - भारतात नवनवीन संशोधन सुरू आहेत. पण अजूनही ग्रामीण भागामध्ये अंधश्रद्धेचा पगडा कमी झालेला नाही. याची प्रचिती पुन्हा एकदा पाहायला मिळाली. चुलत काकाने आपल्या घराच्या नावाने देव उठवलाय आणि त्यामुळेच आपल्या घरात भांडणे होत आहेत, अशा अंधश्रद्धेतून पुतण्याने काकाचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार शिराळा तालुक्यातील कांदे गावात घडला आहे.

सांगलीच्या शिराळा तालुक्यातील कांदे येथे मंगळवारी दुपारी अपहरण करून हा खून करण्यात आला. तुकाराम मारुती कुंभार (वय ६०) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी संशयित आरोपी राहूल बाळासाहेब कुंभार (वय २५) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Uncle killed by nefew because of superstition in kande village of sangli district
आरोपी राहूल कुंभार

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, तुकाराम कुंभार हे चिखली (ता. शिराळा) येथील विश्‍वास सहकारी साखर कारखान्याच्या नर्सरीत कामाला आहेत. मंगळवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे कामाला गेले. सायंकाळी सहाला ते घरी परत यायचे. काल ते परतले नाहीत म्हणून साऱ्यांना शंका आली. सर्वत्र शोधाशोध केली. त्यातून एकाने राहूल कुंभार यानेच तुकाराम यांचे काहीतरी बरेवाईट केले आहे, अशी माहिती दिली. त्यानंतर पोलिसांना कळवण्यात आले.

रात्री उशीरा पोलिसांनी राहूलला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. राहूलने दुपारी नर्सरीत जाऊन तुकाराम यांना महत्वाचे काम आहे असे सांगून बोलावून घेतले. तेथून दुचाकीवर बसवून त्यांना गावातील कुंभार मळा भागात आणले. तेथे त्यांच्यावर हत्याराने हल्ला करून त्यांचा खून केला. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली आहे.

घटनास्थळावरून पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, राहूलने अंधश्रद्धेतून हा प्रकार केल्याचे समजते आहे. तुकाराम कुंभार यांनी देव उठवले आणि त्यामुळेच घरात भांडणे होतात, या संशयातून खून केल्याचे सांगण्यात आले. शिराळा पोलिसांनी संशयित आरोपीस ताब्यात घेतले असून पुढील तपास शिराळा पोलीस स्टेशनचे सपोनि विशाल पाटील करत आहेत.

हेही वाचा - वर्दीकडूनच नियमभंग..विनापरवाना मुंबईतून आपल्या गावी परतली महिला पोलीस.. गुन्हा दाखल करून केले क्वारंटाईन

हेही वाचा -माणुसकीचा झरा : सांगलीतील व्यावसायिक युवकाची मुंबईतील गरजूंना मदत, जीवनावश्यक वस्तूंचे केले वाटप

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.