सांगली - कर्जमाफी हा शब्द मला मान्य नाही. त्यामुळे आपल्याला शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करायची आहे, असे मत शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांनी व्यक्त केले. तसेच काही लोकांचे घड्याळाचे काटे बंद पडले आहेत, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर टीका केली.
इस्लामपूर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार गौरव नायकवडी यांच्या प्रचारार्थ शिवसेना प्रमुखांची सभा पार पडली. यावेळी त्यांनी विरोधी पक्षांना धारेवर धरले.
यावेळी जाहीर सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी काही लोकांचे घड्याळाचे काटे बंद पडल्याची टीका जयंत पाटील यांच्यावर केली. तसेच सदाभाऊ तुम्हाला कधी ताकत कमी पडू देणार नसल्याचे त्यांनी म्हटले. मी शहरी बाबू आहे. मला शेतीमधले काही कळत नाही. पण मला फक्त शेतकऱ्यांचे अश्रू दिसतात असे उध्दव ठाकरे यांनी सांगितले.
हेही वाचा शरद पवार, अजित पवार यांच्यावर टीका; मात्र उध्दव ठाकरेंकडून 'आरे'चा उल्लेखही नाही
तसेच कर्जमाफी हा शब्द आवडत नसल्याने मला कर्जमुक्ती करायची आहे, असे मत व्यक्त उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले. या सभेसाठी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, भाजपचे खासदार संजयकाका पाटील, सेना खासदार धैर्यशील माने, उमेदवार गौरव नायकवडी यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.