सांगली - मिरजेत एक चार-चाकी वाहन पेटवण्याचा प्रकार घडला आहे. दोन नशेत असलेल्या तरुणांनी हे कृत्य केले. यामध्ये चार चाकी वाहन जळाल्याने मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी मिरज पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
नशेत पेटवली गाडी -
उदगाव वेस, शेरबंदे वाडा येथे रात्री दोनच्या सुमार ही घटना घडली. संदीप शेरबंदे यांनी आपले चारचाकी वाहन घराजवळ उभे केले होते. दरम्यान रात्री नशेत धुंद असलेल्या संशयित इसरत बारगीर व रिजवान शिकलगार या दोन तरुणांनी येऊन चारचाकी वाहनावर पेट्रोल टाकून आग लावली. या आगीमध्ये गाडीने पेट घेतला. तसेच गाडीचे टायर फुटून मोठा आवाज झाल्याने संदीप शेरबंदे यांनी घराबाहेर धाव घेतली. त्यांची गाडी जळत असल्याची बाब निदर्शनास आली. यानंतर तातडीने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. पण तोपर्यंत गाडीचा आतील आणि मागील भाग जळाला.
दरम्यान पोलिसांनी याप्रकरणी तपास करत संशयित इसरत बारगीर आणि रिजवान शिकलगार याला अटक केली आहे. मात्र वाहनाला आग लावण्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. याबाबतचा अधिक तपास मिरज शहर पोलीस करत आहेत.