सांगली - चार वर्षाच्या दोघा सख्ख्या जुळ्या बहिणींचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. वाळवा तालुक्यातील ऐतवडे खुर्द या ठिकाणी ही धक्कादायक घटना घडली आहे. विद्या व वेदिका विजय बर्गे असे मृत्यू झालेल्या जुळ्या बहिणींची नावे आहेत.
विद्या आणि वेदिका दुपारच्या सुमारास गावाजवळील बिरोबा मंदिराजवळ खेळण्यासाठी गेल्या होत्या. मात्र त्यांनतर त्या बेपत्ता झाल्या. तेव्हा नातेवाईकांनी आणि ग्रामस्थांनी या दोन्ही मुलांचा शोध सुरू केला. या दरम्यान सायंकाळच्या सुमारास या दोन्ही मुलींचा मृतदेह मंदिराजवळ असणाऱ्या तलावात आढळून आला.
ग्रामस्थांनी या दोन्ही बहिणींचे मृतदेह तलावातून बाहेर काढले आणि कुरळप येथील आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठवले. एकाच दिवशी जन्मलेल्या या दोन्ही सख्ख्या बहिणींचा एकाच वेळी मृत्यू झाल्याच्या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे ऐतवडे खुर्द गावावर शोककळा पसरली आहे.
हेही वाचा - सांगली महापालिकाक्षेत्रात बेकायदा अतिक्रमणांवर महापालिकेचा हातोडा
हेही वाचा - राहुल गांधींना मारहाण प्रकरण : टायर पेटवून आंदोलन करत सांगलीत युवक काँग्रेसने नोंदवला निषेध