सांगली- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे.मंगळवारी कोरोनामुळे आणखी दोन जणांचा बळी गेला आहे.तर दिवसभरात २३ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे.यामध्ये सांगली महापालिका क्षेत्रातील ७ जणांचा समावेश आहे. आणखी ३६ जण कोरोनामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात ३०६ ॲक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत. कोरोनाबाधितांची संख्या ७०४ वर पोहोचली आहे,अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी दिली आहे.
सांगली जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. मंगळवारी यामध्ये आणखी भर पडली आहे. कोरोना उपचार घेणाऱ्या सांगली महापालिका क्षेत्रातील दोन कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.यामध्ये सांगली शहरातील चांदणी चौक येथील ६९ वर्षीय पुरुष आणि वडर गल्ली येथील ६५ वर्षाच्या महिलेचा मृत्यू झाला आहे.एकावर मिरजेच्या कोरोना रुग्णालयात तर एकावर भारती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते.त्यामुळे सांगली जिल्ह्यातील कोरोना मृतांचा आकडा २३ झाला आहे.
मंगळवारी दिवसभरात आणखी २३ नव्या रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये सांगली महापालिका क्षेत्रातील ७ जणांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील वाढलेल्या २३ कोरोना रुग्णांमध्ये कडेगाव तालुका भिकवडी खुर्द-६ ,चिंचणी वांगी १ ,हिंगणगाव १ ,मिरज तालुका - भोसे १ ,बामणोली २ ,कवठेमहांकाळ तालुका - अगळगाव १, कोकळे १ , जत तालुका - निगडी ३ सांगली महापालिका क्षेत्रातील सांगली शहरातील ४ आणि मिरज शहरातील ३ रुग्णांचा समावेश आहे.
मंगळवारी दिवसभरात उपचार घेणारे तब्बल ३६ जण हे कोरोना मुक्त झाले आहेत.त्यांना डिस्चार्ज देऊन इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन मध्ये पाठवण्यात आले आहे. तर एकूण ३७५ जण कोरोनामुक्त झाले आहेत.