ETV Bharat / state

सांगली : शेततळ्यात बुडून दोघा चिमुरड्यांचा दुर्दैवी मृत्यू - सांगली शहर बातमी

शेततळ्यात बुडून दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तासगाव तालुक्यातील आरेवाडी या ठिकाणी ही दुर्दैवी घटना घडली आहे. यामध्ये मावस बहीण-भाऊ असणाऱ्या सहा वर्षीय चिमुरडा आणि सात वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला आहे.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र
author img

By

Published : Jun 10, 2021, 9:27 PM IST

सांगली - शेततळ्यात बुडून दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तासगाव तालुक्यातील आरेवाडी या ठिकाणी ही दुर्दैवी घटना घडली आहे. यामध्ये मावस बहीण-भाऊ असणाऱ्या सहा वर्षीय चिमुरडा आणि सात वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला आहे.

शेततळ्यात बुडून चिमुरड्यांचा दुर्दैवी मृत्यू

तासगाव तालुक्यातील आरवडे या ठिकाणी एका शेततळ्यामध्ये बुडून दोघा मावस बहीण-भावांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. बुधवारी (दि. 9 जून) रात्रीच्या सुमारासही घटना घडली आहे. शौर्य मस्के (वय 6 वर्षे) आणि ऐश्वर्या आवटी (वय 8 वर्षे), अशी मृत्यू झालेल्या चिमुरड्या मुलींची नाव आहेत. या घटनेमुळे तासगाव तालुक्‍यात खळबळ उडाली आहे.

मोबाईलमुळे लागला शोध

आरवडे-गोटेवाडी रोडलगत असणाऱ्या मस्के वस्ती येथे आपल्या घराबाहेर शौर्य व ऐश्वर्या नेहमीप्रमाणे खेळत होती. मात्र, सायंकाळीनंतर दोन्ही मुले कुठेच दिसत नसल्याने घरच्यांनी शोध सुरू केला. दरम्यान, घराच्या मागे असणाऱ्या शेत तळ्याच्या दिशेने शोध सुरू केला. शेततळ्याजवळ मोबाईल आढळून आला. त्यानंतर ते दोघेही पाण्यात पडल्याचा अंदाज आल्याने पाण्यामध्ये शोध घेण्यास सुरुवात केली. दोघांचेही मृतदेह शेततळ्याच्या तळ भागात आढळले. यानंतर दोघांचे मृतदेह पाण्याच्या बाहेर काढण्यात आले. खेळायला जाऊन पाय घसरून पडल्याने त्या दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

आजोबा घेण्यासाठी आले, पण ऐश्वर्या गेली नाही

ऐश्वर्या आवटी ही सांगली नजीकच्या माधवनगर या ठिकाणी राहते. काही दिवसांपूर्वी ती सुटीसाठी आपली मावशीच्या घरी आरवडे या ठिकाणी आली होती. शौर्य हा तिचा मावसभाऊ दोघे या ठिकाणी नेहमी अंगणात खेळत होते. बुधवारी (दि. 9 जून) सकाळी ऐश्वर्याचे आजोबा माधवनगरहून तिला घेण्यासाठी आरवडे याठिकाणी आले होते. मात्र, नातेवाईकांना अजून चार दिवस ऐश्वर्याला राहू द्या, अशी विनंती केली. त्यामुळे ऐश्वर्याचे आजोबा हे ऐश्वर्याला न घेताच माधवनगरला परतले.

नातेवाईकांना आक्रोश अनावर

दोघां चिमुरड्यांचा मृत्यूच्या घटनेमुळे नातेवाईकांचा प्रचंड आक्रोश घटनास्थळी पाहायला मिळाला. हृदय हेलावून टाकणाऱ्या या घटनेमुळे काही नातेवाईकांना धक्काही बसला होता. नातेवाईकांची मानसिक स्थिती पूर्ण बिघडल्याने त्यांना त्रास होऊ लागला होता. मात्र, घटनास्थळी तासगाव आरोग्य केंद्राचे डॉक्टर रुग्ण रुग्णवाहिका घेऊन रात्री उशिरापर्यंत उपस्थित होते. त्यांनी त्रास होणाऱ्या नातेवाईकांचे उपचारही केला घटनास्थळी गांभीर्य ओळखून 108 रुग्णवाहिका ठेवण्यात आली होती.

आणखी दोघा बहीण-भावांचा दुर्दैवी मृत्यू

तीन दिवसांपूर्वी आटपाडी तालुक्यातील घानंद या ठिकाणी तलावाच्या बंधाऱ्यात बुडून तिघा भावंडांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच तासगाव तालुक्यातील आरवाडे याठिकाणी मावस बहीण-भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याच्या घटनेने तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.

हेही वाचा - मराठा आरक्षणासाठी 25 जूनला मुंबईत राज्यव्यापी गोलमेज परिषद

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.