कणेगाव (सांगली) - पुणे-बेंगळुरू महामार्गावरील कणेगाव ते बहादुरवाडी रोडवर गुरुवारी श्वानांच्या शर्यती आयोजित करण्यात आल्या होत्या. कुरळप पोलीस ठाणे हद्दीतील कणेगाव येथे गुरुवार दि. 10 रोजी गावठी कारवानी श्वानांच्या शर्यती आयोजित करण्यात आली असल्याची माहिती कुरळप पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांना मिळाली होती. यावरून कुरळप पोलिसांनी छापा टाकून करण भास्कर शिरतोडे (रा. कणेगाव) व एक अल्पवयीन यांना ताब्यात घेतले आहे. तर बाकी लोक पळून गेले. या शर्यतीसाठी कराड, उंब्रज व इतर भागातून ही लोक आले असल्याची माहीती मिळाली. घटनास्थळावरून पोलिसांनी एकूण 7 मोटर सायकली, अंदाजे २, लाख ९० हजार रुपये किंमतीच्या जप्त करण्यात आल्या आहेत. या घटनेबाबत पोलीस नायक भूषण महाडिक यांनी फिर्याद दिल्याने कणेगाव येथील दोघांवर कुरळप पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम १८८, २६९ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
'...तर कठोर कारवाई'
या गुन्हयाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक जाधव यांचे मार्गदर्शनाखाली बीट अंमलदार अनिल पाटील करीत आहेत. कोरोना रोगाचे प्रादुर्भाव रोखण्याचे अनुशंगाने सहकार्य करावे व कोरोना रोग प्रसार होईल असे कृत्य केलेस कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांनी कुरळप पोलीस ठाणे हद्दीतील नागरीकांना केले आहे.
हेही वाचा-ठाणे : शासनाची बंदी झुगारून बैलगाडी शर्यती; आयोजकांवर गुन्हा दाखल