ETV Bharat / state

सांगलीत २३ नव्या कोरोना रुग्णांची भर; १४ जण कोरोनामुक्त... - sangli latest news

सांगली जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ४२८ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी २५५ जण कोरोनामुक्त झाले आहेत, तर १२ जणांचा मृत्यू झाला.

sangli corona update
सांगली कोरोना अपडेट
author img

By

Published : Jul 3, 2020, 8:34 AM IST

सांगली- जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात तब्बल २३ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. १४ जण कोरोनामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यातल्या ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या १६० झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ४२८ कोरोना रुग्णांची नोंद झाली. मिरजेच्या कोरोना रुग्णालयात उपचार घेणाऱ्या कर्नाटक राज्यातील एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी दिली आहे.

सांगली जिल्ह्यातल्या कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. जिल्ह्यात गुरुवारी रात्री पर्यंत तब्बल २३ नव्या रुग्णांची भर पडली आणि १४ जण कोरोनामुक्त झाले आहेत. गुरुवारी नव्याने आढळलेल्या रुग्णांमध्ये जत तालुक्यातील बिळूर मधील ५ ,असंगी मधील १ आणि मेंढीगिरी मधील १ रुग्णांचा समावेश आहे. पलूस तालुक्यातील अमणापूर येथील ५ ,दुधोंडी येथील १, कडेगाव तालुक्यातील हिंगणगाव बुद्रुक येथील १, आटपाडी तालुक्यातील कानकातरेवाडी येथील १ ,कवठेमहांकाळ तालुक्यातील ढालेवाडी येथील १, खानापूर तालुक्यातील वेजेगाव येथील १ रुग्ण आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी व जयसिंगपूर येथील २, सोलापूर मधील १, कर्नाटक राज्यातील विजापूर येथील १ आणि अथणी येथील ३ अशा २३ जणांचा समावेश आहे. या सर्वांवर मिरजेच्या कोरोना रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आहेत.

गुरुवारी १४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामध्ये शिराळा तालुक्यातील मणदूर येथील २, शिराळे १, निगडी १, तर वाळवा तालुक्यातील वशी येथील २, मिरज तालुक्यातील मौजे डिग्रज मधील ४, कडेगाव तालुक्यातील अमरापूर येथील २ ,रायगाव १, आणि कवठेमहांकाळच्या तिसंगी येथील १ असे १४ जण हे कोरोना मुक्त झाले आहेत.त्यांना मिरजेच्या कोरोना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

मिरजेच्या कोरोना रुग्णालयात उपचार घेणाऱ्या कर्नाटक राज्यातील अथणी येथील एक ४० वर्षीय कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे.दिवसभरात वाढलेले रुग्ण व कोरोना मुक्त रुग्ण यामुळे जिल्ह्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या १६० वर पोहोचली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ४२८ कोरोना रुग्णांची नोंद झाली असून यापैकी २५५ जण कोरोना मुक्त झाले आहेत. १२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.अशी माहिती अभिजीत चौधरी यांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.