ETV Bharat / state

पूल ओलांडण्याचा जीवघेणा प्रयत्न; ट्रॅक्टर पलटी, एकजण पुरात वाहून गेला - Heavy rain in jat

बोर नदीला आलेल्या पुरातून ट्रॅक्टर बाहेर काढत असताना झालेल्या दुर्दैवी घटनेत ट्रॅक्टर पलटी होऊन एकजण पुरात वाहून गेला. तर ट्रॅक्टर चालक बचावला आहे. पिंटू धायगुडे वय 28 रा.सनमडी असे वाहून गेलेल्या तरुणाचे नाव आहे.

Tractor overturned in Jat taluka
जत- तालुक्यात ट्रॅक्टर पलटी
author img

By

Published : Oct 16, 2020, 7:16 AM IST

Updated : Oct 16, 2020, 7:43 AM IST

जत- तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून पावसाने थैमान घातले असून तालुक्यातील सर्व पूलावरून पाणी वाहत आहे. यामध्ये नागरिक आपला जीव धोक्यात घालून पूल ओलांडण्याचा जीवघेणा प्रयत्न करीत आहेत.अशीच घटना जत तालुक्यातील करजगी नजीक घडली. बोर नदीला आलेल्या पुरातून ट्रॅक्टर बाहेर काढत असताना झालेल्या दुर्दैवी घटनेत ट्रॅक्टर पलटी होऊन एकजण पुरात वाहून गेला. तर ट्रॅक्टर चालक बचावला आहे. पिंटू धायगुडे वय 28 रा.सनमडी असे वाहून गेलेल्या तरुणाचे नाव आहे.

जत- तालुक्यात ट्रॅक्टर पलटी
दरम्यान, करजगी, भिवर्गी येथील ग्रामस्थ, उमदी पोलीस सायंकाळी उशिरापर्यंत वाहून गेलेल्या तरुणाचा शोध घेत होते. जतच्या करजगी येथील चेन्नई दूध डेअरीसाठी दुध संकलन करून ट्रॅक्टरमधून नेत असताना करजगी-भिवर्गी दरम्यान असणाऱ्या बोर नदीत पुलावर पाणी प्रवाह जास्त असल्यामुळे ट्रॅक्टर पलटी झाला. सुदैवाने ड्रायव्हर वाचला परंतु ट्रॉलीमध्ये बसलेला युवक पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला आहे.

हेही वाचा-'...अन्यथा 29 ऑक्टोबरला पुण्यातील लाल महालावर धडक देण्याचा निर्धार'

गेल्या आठवड्यापासून संततधार पावसामुळे जत तालुक्यातील काही गावातील मातीच्या घरांची मोठया प्रमाणात पडझड होऊन नुकसान झाले आहे. पडझड झालेल्या घरांमध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. बागलवाडी सिघनहळी, सोन्याळ येथील घरांचे पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जत येथील मंडळ अधिकारी भरत काळे, तलाठी डी.डी.पाटील यांनी घटनास्थळाचे पंचनामे केले असून नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत मिळावी,अशी मागणी होत आहे.

तालुक्यात मंडळ निहाय झालेला पाऊस

जत तालुक्यात मे महिन्यापासून आज अखेर झालेला पाऊस पुढील प्रमाणे- जत मंडळ २७६ मिमी, डफळापूर १७५ मिमी, शेगाव १२३ मिमी, कुंभारी १४० मिमी, माडग्याळ १६२ मिमी, संख १०१ मिमी, उमदी ९७ मिमी, मुचंडी १०६ मिमी अशी पावसाची नोंद आहे.

हेही वाचा- सोलापूर महापूर भीषणता:14 जणांचा मृत्यू;570 गावे उद्धवस्त

Last Updated : Oct 16, 2020, 7:43 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.