ETV Bharat / state

Till 25th Will Not Keep Opponents: आता 23 सुरू आहे 25चा होईपर्यंत विरोधकांना शिल्लक ठेवणार नाही - रोहित पाटील - Son Of RR Patil

आत्ता माझं वय 23 आहे, पंचवीस होईपर्यंत काहीच शिल्लक (not keep opponent) ठेवत नाही, असा इशारा राष्ट्रवादीचे युवा नेते व स्वर्गीय आर.आर.पाटील यांचे चिरंजीव (Son Of RR Patil) रोहित पाटील ( Rohit Patil) यांनी दिला आहे. कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या (Kavathemahankal Nagar Panchayat) निवडणुकीच्या प्रचार शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढत आहेत.

Rohit Patil
रोहित पाटील
author img

By

Published : Dec 15, 2021, 12:50 PM IST

सांगली: कवठेमहांकाळ नगर पंचायतीची निवडणूक सध्या सुरू आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने युवा नेते रोहित पाटील यांच्या राजकीय कारकिर्दीला खऱ्या अर्थाने सुरुवात होत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस ही निवडणूक स्वबळावर लढवत आहे. महाविकास आघाडीत एकत्र असणाऱ्या काँग्रेस आणि शिवसेनेने या ठिकाणी भाजपाशी आघाडी केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी विरुद्ध भाजप, शिवसेना, काॅंग्रेस शेतकरी विकास आघाडी अशी लढत होताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराचा शुभारंभ बुधवारी झाला रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखाली शहरातून प्रचार पदयात्रा काढण्यात आली.

रोहित पाटील

काहीच शिल्लक ठेवणार नाही
यावेळी आयोजित प्रचार सभेत अनेक नेत्यांनी बोलताना पंचवीस वर्षाच्या तरुणाला हरवण्यासाठी सर्व विरोधक एकवटले,असे मत व्यक्त केले. हा धागा पकडत रोहित पाटील यांनी आपण सगळ्यांनी सांगितले 25 वर्षाच्या तरुणाला हरवायला सगळे एकत्र आले आहेत, पण आता माझं वय 23 आहे,आणि 25 होईपर्यंत काहीच शिल्लक ठेवत नाही असा इशारा विरोधकांना दिला आहे.

आर.आर. गट विरुद्ध सर्व
तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघ आर.आर.आबा पाटील यांचा गड मानला जातो. त्यांना संजय पाटील यांच्याशी नेहमीच संघर्ष करावा लागला. त्याच मतदार संघातल्या कवठेमंकाळ नगरपंचायत निवडणूकीच्या माध्यमातून भाजपाचे खासदार संजयकाका पाटील, शिवसेनेचे नेते व माजी मंत्री अजितराव घोरपडे त्याचबरोबर महांकाली साखर कारखान्याच्या अध्यक्षा व राष्ट्रवादीच्या नेत्या अनिता सगरे यांनी एकत्र येऊन राष्ट्रवादीला म्हणजेच आर.आर.पाटील गटाला नगरपंचायत निवडणूकीच्या निमित्ताने आव्हान दिले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.