ETV Bharat / state

पाणी प्रदुषणाचा फटका; ऐन पावसाळ्यात कृष्णा नदीतील हजारो माशांचा मृत्यू - died

ऐन पावसाळ्यात नदी प्रवाहित असताना कृष्णा नदीतील हजारो मासे मृत्यूमुखी पडले आहेत. कृष्णाकाठी असणाऱ्या काही साखर कारखान्यांमधून सोडण्यात आलेल्या मळी मिश्रित दूषित पाण्यामुळे माशांचा मृत्यू झाल्याचं बोललं जात आहे. मात्र, यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

प्रदुषणामुळे कृष्णा नदीतील हजारो मासे मृत्युमुखी
author img

By

Published : Jul 10, 2019, 3:28 PM IST

सांगली- ऐन पावसाळ्यात प्रदुषणामुळे कृष्णा नदीतील हजारो मासे मृत्युमुखी पडले आहेत. त्यामुळे नदीकाठी माशांचा खच पडला आहे. कृष्णाकाठी असणाऱ्या काही साखर कारखान्यांमधून सोडण्यात आलेल्या मळी मिश्रित दूषित पाण्यामुळे माशांचा मृत्यू झाल्याचं बोललं जात आहे. मात्र या घटनेमुळे कृष्णाकाठी भीतीचे वातावरण पसरले आहे.

सांगलीतील कृष्णा नदीच्या पाणी पातळीत गेल्या तीन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. संततधार पावसामुळे पाणी पातळी वाढली आहे. त्यामुळे कृष्णा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात मासे सापडत आहेत. कसबे डिग्रस बंधाऱ्यावर मासे सहजतेने हाताला लागत होते. त्यामुळे ग्रामस्थांची मासे पकडण्यासाठी झुंबड उडाल्याचे पाहायला मिळाले. मात्र आता याच कृष्णा नदीच्या पात्रात मंगळवारी हजारो मासे मृत्यूमुखी पडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

प्रदुषणामुळे कृष्णा नदीतील हजारो मासे मृत्युमुखी

ऐन पावसाळ्यात प्रवाहित असणाऱ्या कृष्णेच्या नदीपात्रात माशांच्या मृत्यूमुळे एकच खळबळ उडाली आहे. कृष्णाकाठी असणाऱ्या अनेक गावांमध्ये सध्या मृत माशांचे खच पडलेले दिसून येत आहे. त्यामुळे कृष्णेच्या पात्रात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली असून आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कृष्णाकाठी भीतीचे वातावरण पसरले आहे.

कृष्णाकाठी असणाऱ्या काही साखर कारखान्यांचे मळीमिश्रित पाणी नदीपात्रात सोडल्यामुळे हा सर्व प्रकार घडल्याचे बोलले जाते. याआधीही कृष्णा नदीच्या पात्रामध्ये अनेक वेळा माशांचे मृत्यूचे प्रकार घडले आहेत. मात्र या कारखान्यांवर केवळ प्रदूषण महामंडळाकडून जुजबी कारवाई करण्यात आली असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

ऐन पावसाळ्यात नदी प्रवाहित असताना माशांचा मृत्यू धक्कादायक घटना आहे. त्यामुळे प्रदूषण मंडळ नेमकी काय भूमिका घेणार आणि संबंधित कारखान्यावर कारवाई करणार का ? हा प्रश्न निर्माण झाला आहे.

Intro:सरफराज सनदी - सांगली.

AVB

FEED SEND FILE NAME - mh_sng_01_mase_mrtyu_krushna_nadi_vis_1_7203751

स्लग - ऐन पावसाळ्यात पाणी प्रदूषणामुळे कृष्णा नदीतील हजारो मासे मृत्युमुखी...

अँकर - ऐन पावसाळ्यात प्रदूषणामुळे कृष्णा नदीतील हजारो मासे मृत्युमुखी पडले आहेत,त्यामुळे नदी काठी माश्यांचा खच पडत आहे.कृष्णा कृष्णाकाठच्या काही साखर कारखान्यांच्या कडुन सोडण्यात आलेल्या मळी मिश्रित दूषित पाण्यामुळे माशांचा मृत्यू झाल्याचं बोललं जात आहे.मात्र या घटनेमुळे कृष्णाकाठी भीतीचे वातावरण पसरले आहे.Body:व्ही वो - सांगलीतील कृष्णा नदीच्या पाणी पातळीत गेल्या तीन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. संततधार पावसामुळे पाणी पातळी वाढली आहे.त्यामुळे कृष्णा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात मासे सापडत आहेत. दोन दिवसांपूर्वी कसबे डिग्रज बंधाऱ्यावर माशांचा पुर आल्याचा परिस्थिती निर्माण झाली होती.हजारो मासे या ठिकाणी आलगत ग्रामस्थांच्या हाताला येत होते. त्यामुळे मासेमारी करण्यासाठी कृष्णाकाठावर नागरिकांची झुंबड उडाल्याचे पाहायला मिळाले होते.मात्र आता याच कृष्णा नदीच्या पात्रात काल सायंकाळपासून पात्रात हजारो मासे मृत्यूमुखी पडल्याचं धक्कादायक प्रकार समोर आलाय आहे.ऐन पावसाळ्यात प्रवाहित असणाऱ्या कृष्णेच्या नदीपात्रात माशांच्या मृत्युमुळे एकच खळबळ उडाली आहे.त्यामुळे कृष्णाकाठी अनेक गावांमध्ये सध्या मृत माशांचे खच पडलेले आहेत.त्यामुळे कृष्णेच्या पात्रात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरू लागली आहे. परिणामी मृत्यूचे प्रकरण प्रकारामुळे कृष्णाकाठी भीतीचे वातावरण पसरले आहे.कृष्णाकाठी असणाऱ्या काही साखर कारखान्यांच्या मळीमिश्रित पाणी नदीपात्रात सोडल्यामुळे हा सर्व प्रकार घडल्याचे बोलले जाते.याआधीही कृष्णा नदीच्या पात्रामध्ये अनेक वेळा माशांचे मृत्यूची प्रकार घडले आहेत.मात्र या कारखान्यांच्यावर केवळ प्रदूषण महामंडळाकडून जुजबी कारवाई करण्यात आली आहे.पण ऐन पावसाळ्यात नदीत प्रवाहित असताना माशांचा मृत्यू धक्कादायक घडल्याने, प्रदूषण मंडळ नेमकी काय भूमिका घेणार आणि संबंधित कारखान्यावर कारवाई करणार का ? हा प्रश्न निर्माण झाला आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.