सांगली - मिरजेच्या आरगमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. एकाच रात्रीत सहा दुकाने व एक घर फोडले. यावेळी चोरट्यांनी लाखोंचा मुद्देमाल लंपास केला असून चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे.
सांगलीच्या मिरज तालुक्यातील आरगमध्ये रविवारी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी धुमाकूळ घातला. गावातील बाजारपेठेतील सहा दुकाने आणि एक घर फोडण्यात आले. एकाच वेळी चोरट्यांनी दुकाने फोडून दुकानातील साहित्य चोरले आहे. तर गावात असणारे एक घर सुद्धा फोडून चोरट्यांनी घरातील मुद्देमाल लंपास केला आहे. दरम्यान, चौघा चोरट्यांचा चोरीचा धुमाकूळ एका सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. पण एकाच वेळी सात ठिकाणी चोरीची घटना घडल्याने आरग परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.