ETV Bharat / state

सांगलीत गणेश मार्केट मध्ये 4 दुकानात चोरी, घटना सीसीटीव्ही मध्ये कैद

author img

By

Published : Dec 21, 2020, 10:16 PM IST

Updated : Dec 21, 2020, 10:21 PM IST

सांगली शहरातील गणेश मार्केट याठिकाणी चोरीचा प्रकार घडला आहे.

Theft in 4 shops in Sangli
4 दुकानात चोरी

सांगली - सांगली शहरातील गणेश मार्केट याठिकाणी चोरीचा प्रकार घडला आहे. 4 दुकानात चोरट्यांनी चोरी करत हजारोंचा मुद्देमाल लंपास केला आहे. दरम्यान या चोरीचा प्रकार एका दुकानातील सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. याप्रकरणी चोरीच्या घटनेची नोंद सांगली शहर पोलीस ठाण्यात झाली आहे.

सांगलीत 4 दुकानात चोरी
चोरीचा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद-सांगली शहरातील स्टेशन चौक येथील असणाऱ्या गणेश मार्केट याठिकाणी मध्यरात्रीच्या सुमारास चोरीचा प्रकार घडला आहे. दोन ते तीन अज्ञात चोरट्यांनी मार्केटमध्ये असणाऱ्या 4 दुकानात चोरी केली आहे. दुकानांचे शटर तोडून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला आणि दुकानात असणारा मुद्देमाल चोरून नेला आहे. पान टपरी, कापड दुकानासह इतर दुकानात ही चोरी झाली आहे. सोमवारी हा चोरीचा प्रकार उघडकीस आला. यानंतर शहर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तसेच अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.

हेही वाचा- नाशिक :शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातून शेकडो शेतकरी दिल्लीकडे रवाना

Last Updated : Dec 21, 2020, 10:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.