ETV Bharat / state

बेदरकारपणे ट्रक चालवणाऱ्या मद्यधुंद ट्रक चालकाने तरुणाला चिरडले

आटपाडी-भिंगेवाडी रस्त्यावर असणाऱ्या डायनॅमिक स्कूलजवळ हा अपघात घडला आहे. मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगाने ट्रक चालकाने शहरातील पहिल्यांदा ऊसाचा घाणा असणारे एक दुकान उडवले, त्यानंतर तसेच सुसाट गाडी नेऊन दोन दुचाकीस्वारांना उडवले.

सांगली अपघात
सांगली अपघात
author img

By

Published : Mar 31, 2021, 3:23 PM IST

सांगली - आटपाडी याठिकाणी एका मद्यधुंद ट्रक चालकाने भरधाव ट्रकने एक दुकान, दोन दुचाकीस्वारांना उडवत एकाला चिरडले आहे. यामध्ये विक्रमसिंह देशमुख हा तरुण जागीच ठार झाला असून यानंतर संतप्त जमावाने ट्रक चालकास बेदम मारहाण केली.

मद्यधुंद चालकाचा पळ काढण्याचा प्रयत्न

आटपाडी-भिंगेवाडी रस्त्यावर असणाऱ्या डायनॅमिक स्कूलजवळ हा अपघात घडला आहे. मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगाने ट्रक चालकाने शहरातील पहिल्यांदा ऊसाचा घाणा असणारे एक दुकान उडवले, त्यानंतर तसेच सुसाट गाडी नेऊन दोन दुचाकीस्वारांना उडवले. एका व्यक्तीच्या अंगावरून ट्रक घालून चिरडत ठार केले आहे. या अपघातात यापावाडी येथील विक्रमसिंह रवींद्र देशमुख हा तरुण जागीच ठार झाला. अपघातानंतर मद्यधुंद चालकाने पळ काढण्याचा प्रयत्न केला. पण जमावाने त्याला पकडत बेदम चोप दिला व पोलिसांच्या ताब्यात दिले.

जमाव आक्रमक

या प्रकरणी हिट अँड रनचा गुन्हा दाखल करण्यासाठी जमावाने आक्रमक पवित्रा घेत ट्रक पोलीस ठाण्यात नेण्यास विरोध केला. यामुळे पोलीस अधिकारी आणि जमाव यांच्यात प्रचंड बाचाबाची आणि वादंग झाल्याने मोठा तणाव निर्माण झाला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.