ETV Bharat / state

अवघ्या 12 तासात चोरीचा छडा, दोघांना अटक करत 67 हजारांचा मुद्देमाल हस्तगत..

author img

By

Published : Nov 30, 2020, 4:06 PM IST

किराणा मालाच्या दुकानात चोरी करुन 32 हजार रोकड आणि चांदीची नाणी असे, एकूण 67 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल लंपास केलेल्या चोरट्यांना जेरबंद करण्यात कुपवाड पोलिसांना यश मिळाले आहे. त्यांच्या मुद्देमालासह त्यांना ताब्यात घेतले आहे.

Two thieves arrested
दोन चोरट्यांना अटक

सांगली - अवघ्या 12 तासात एका चोरीचा छडा लावत कुपवाड पोलिसांनी दोघा चोरट्यांना अटक केली. या चोरट्यांकडून 67 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. विजय मस्के आणि अदनान ममुल्ला, अशी अटक करण्यात आलेल्या तरुणांची नावे आहेत.

12 तासात चोरीचा छडा..

कुपवाड शहरातील बस स्थानक परिसरात असणाऱ्या एका किराणा दुकानात शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरीचा प्रकार घडला होता. ज्यामध्ये चोरट्यांनी दुकानात असणारी 32 हजार रोकड आणि चांदीची नाणी असे, एकूण 67 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. या प्रकरणी राजेंद्र पाटील यांनी कुपवाड पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल केला होता. कुपवाड पोलिसांनी या चोरीचा गतीने तपास करत अवघ्या 12 तासात चोरीचा छडा लावला आहे.

67,000 items were seized
67 हजारांचा मुद्देमाल हस्तगत..

हेही वाचा - ईडी, सीबीआयला सीमेवर पाठवा; पाक आणि चीन शरण येईल'

या चोरी प्रकरणी मिरजेतून दोघा चोरट्यांना अटक करत त्यांच्याकडून चोरी केलेला 67 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. विजय मस्के,वय 23 आणि अदनान मुल्ला वय ,29 असे या संशयित चोरट्यांची नावे आहेत.

हेही वाचा - अभिनेत्री उर्मिला मातोंडकरांचा शिवसेना प्रवेश आज नव्हे तर उद्या

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.