सांगली - बलात्कार प्रकरणात चार महिन्यापासून पसार असलेल्या निलंबित पोलीस निरीक्षकाला अखेर अटक करण्यात आली आहे. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाचे आमिष दाखवत एका तरूणीवर बलात्कार केल्याचा गुन्हा तत्कालीन कडेगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिनेश हसबनीस यांच्यावर दाखल झाला होता. तेव्हापासून हसबनिस हे पसार होते. अखेर गुरुवारी त्यांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने 7 दिवसांची कोठडी सुनावली आहे.
निलंबित पोलीस निरीक्षक अखेर अटकेत..
कडेगाव येथे एका 28 वर्षीय युवतीवर एमपीएससी व यूपीएससी स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन करण्याचे आमिष दाखवून कडेगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिनेश हसबनिस यांनी बलात्कार केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी पीडित तरुणीने कडेगाव पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक हसबनिस यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. त्यांनतर हसबनिस हे पसार झाले होते. तसेच या बलात्कार प्रकरणी दिनेश हसबनिस यांना निलंबित करण्यात आले होते.
हसबनिस यांनी बलात्कार प्रकरणी जामीन अर्जासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र उच्च न्यायालयाने अर्ज फेटाळल्याने चार महिन्यापासून फरारी असणारे हसबनिस हे गुरुवारी स्वतः कडेगाव पोलीस ठाण्यात हजर झाले. यानंतर कडेगाव पोलिसांनी हसबनिस यांना अटक करत कडेगाव येथील न्यायालयात हजार केले. न्यायालयाने त्यांना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
त्याचं ठाण्यात राहावे लागणार कोठडीत-
कडेगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक म्हणून हसबनिस हे कार्यरत होते. कानी बलात्कार प्रकरणी त्यांच्यावर टीच पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.ज्या पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक म्हणून नेमणूक होती. त्याच पोलीस ठाण्यात आता हसबनिस यांना 7 दिवस कोठडीत काढावे लागणार आहे. 23 डिसेंबर पर्यंत हसबनिस यांना पोलीस कोठडी मिळाली आहे.
हेही वाचा- तुमची डिलिव्हरी, तुमची जबाबदारी; अॅमेझॉनला मनसेचा इशारा