ETV Bharat / state

कुरळप कृषी मंडलकडून ऊस शेती कार्यशाळेचे आयोजन... - कृषी कार्यशाळा सांगली

सुपर केन नर्सरी टेक्निकमुळे शेतकऱ्यांची 18 ते 20 मोळ्यात एक एकर ऊसाची लागण होऊ शकते. यामुळे शेतकऱ्यांची पैशाची बचत होऊन उत्पन्नही वाढणार आहे. तर शेतकऱ्यांनी घरातच सुपर केन नर्सरी कशी बनवावी याचे लाडेगाव कृषी सहाय्यक अधिकारी सागर फसाले यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

sugarcane-farming-workshop-in-sangli
कुरळप कृषी मंडलकडून ऊस शेती कार्यशाळेचे आयोजन...
author img

By

Published : Jun 24, 2020, 4:32 PM IST

सांगली - कुरळप कृषी मंडलमार्फत ऊस शेती कार्यशाळा घेण्यात आली. यात माती परिक्षण, ऊस लागवड पद्धत, आधुनिक पद्धतीने एक डोळा रोपे तयार करणे या विषयी सहाय्यक कृषी अधिकारी यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

कुरळप कृषी मंडलकडून ऊस शेती कार्यशाळेचे आयोजन...

सांगली, वाळवा तालुक्यात सध्या ऊस लागवडीला सुरुवात झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर कुरळप व करंजावडे गावातील शेतकऱ्यांना बुधवारी ऊस शेतीसाठी मार्गदर्शन करण्यात आले. शेतकऱ्यांना कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन मिळण्यासाठी या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आले. कुरळप कृषी मंडल कार्यालय इस्लामपूर यांच्यावतीने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. माती परिक्षण कसे करावे, कोणत्या ठिकाणची माती निवडावी, याबाबत सविस्तर माहिती सांगण्यात आली. सध्या शेतकरी एका एकरासाठी ऊसाच्या 80 मोळ्या वापरत आहेत. यामुळे त्यांना होणारा खर्च याचा विचार करुन सध्या कृषी मंडल इस्लामपूर यांच्यामार्फत सुपर केन नर्सरी टेक्निक याचा प्रयोग केला आहे.

सुपर केन नर्सरी टेक्निकमुळे शेतकऱ्यांची 18 ते 20 मोळ्यात एक एकर ऊसाची लागण होऊ शकते. यामुळे शेतकऱ्यांच्या पैशाची बचत होऊन उत्पन्नही वाढणार आहे. तर शेतकऱ्यांनी घरातच सुपर केन नर्सरी कशी बनवावी याचे लाडेगाव कृषी सहाय्यक अधिकारी सागर फसाले यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. शेतकरी शेती शाळेचे नियोजन कुरळप करंजावडे कृषी सहाय्यक अधिकारी गणेश शेवाळे यांनी केले होते. या कार्यक्रमात 35 शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी कुरळप कृषी अधिकारी विवेक ननावरे उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.