सांगली- पुणे-बंगळूरु राष्ट्रीय महामार्गावर पाच गाड्यांचा विचित्र आपघात झाल्याची घटना घडली. अचानक थांबलेल्या समोरच्या गाडीवर एकामागून एक 4 गाड्या आदळल्या. अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
एकामागून एक धडकल्या 5 गाड्या
नेर्ले गावातून अज्ञात चारचाकी वाहनाने महामार्गावर सरळ प्रवेश केला. अचानक आलेल्या या वाहनामुळे कोल्हापूरहून पुण्याकडे जाणाऱ्या वाहचालकाने एकदम गाडीला ब्रेक मारला. त्यामुळे मागून येणाऱ्या ४ गाड्यांनीही ब्रेक मारला. परंतू गाडीचा वेग जास्त असल्यामुळे त्या गाड्या समोरच्या चारचाकीवर जोरात आदळल्या.
सुदैवाने जीवितहानी नाही
या विचित्र अपघातानंतर बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, ५ ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये एक मालवाहतूक गाडीचाही समावेश आहे.