सांगली - दारुच्या नशेत आईसोबत वाद घालणाऱया एका मुलाने आईची हत्या केली आहे. जिल्ह्यातील जतमध्येही धक्कादायक घटना घडली. मंजुळा राजाराम जाधव असे मृत आईचे नाव आहे. तर श्रीकांत राजाराम जाधव (वय 50) असे आरोपीचे नाव आहे. या घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरुन फरार झाला होता. मात्र, जत पोलीस ठाणे आणि उपविभागीय पोलीस कार्यालयाच्या संयुक्त पथकाने आरोपी श्रीकांत याला कोल्हापूर येथून अटक केली.
याबाबत माहिती अशी, आरोपी श्रीकांत (रा. दुधाळवस्ती, जत) दारूच्या नशेत सतत त्याच्या आईसोबत वाद घालत असे. नेहमी प्रमाणे गुरुवारी देखील श्रीकांतने दारूच्या नशेत आईकडे 30 हजार रुपयांची मागणी करत वाद घातला. यावेळी मंजूळा यांनी माझ्याकडे पैसे नाहीत, असे सांगितले. त्याचा ४ वर्षाचा पुतण्या हा सर्व प्रकार पाहत होता. वाद होत असल्याने तो शेजारी राहणाऱ्यांना बोलविण्यासाठी बाहेर पडला, तेवढ्यात घराच्या बाहेर मंजुळा जाधव या आल्या असता श्रीकांतने स्वत:च्या आईच्या पोटात धारदार शस्त्राने गंभीर वार करत त्यांची हत्या केली.
हेही वाचा - 'न्यायव्यवस्थेकडून लवकर न्याय मिळत नाही म्हणूनच लोकांमध्ये तीव्र भावना'
घटनेनंतर तो फरार झाला होता. मात्र, जत पोलीस ठाणे आणि उपविभागीय पोलीस कार्यालयाच्या संयुक्त पथकाने आरोपीला श्रीकांत याला कोल्हापूर येथून अटक केली. यानंतर संशयित आरोपी श्रीकांत विरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनेने जत शहरात खळबळ माजली आहे. तर नागरिकांमध्ये असंतोष व्यक्त केला जात आहे.