सांगली - देशात साधूंच्यावर होणाऱ्या हल्ल्याला केवळ बॉलीवूड जबाबदार असून, यापुढे साधूंच्यावर होणाऱ्या बदनामीकारक चित्रपट आणि मालिकांवर बंदी घालावी. अशी मागणी शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तानच्या वतीने करण्यात आली ( Shiv Pratishthan Yuva Hindustan statemant ) आहे. त्याचबरोबर साधू संतांच्या वर हल्ले रोखण्यासाठी कडक कायदा करावा, अशी मागणी देखील शिवप्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आली ( Bollywood responsible for attacks on Sadhus ) आहे.
साधू संतांच्यावर होणाऱ्या हल्ल्यांना केवळ बॉलीवूड जबाबदार असल्याचा आरोप उत्तर प्रदेशच्या मथुरा येथील चौघा साधूंना जत तालुक्यातल्या लवंगा या ठिकाणी मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला ( attacks on Sadhus ) आहे. या घटनेनंतर त्याचे संतप्त पडसाद उमटत आहेत. तर शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तानच्या वतीने आज सांगली पोलिसांच्या सत्कार करण्यात आला आहे. पालघर सारखी घटना टाळून पोलीस दलाने साधूंना वाचवल्याबद्दल हा सत्कार करण्यात आला आहे. तसेच साधू संतांच्यावर होणाऱ्या हल्ल्यांना केवळ बॉलीवूड जबाबदार असल्याचा आरोप शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तानचे संस्थापक अध्यक्ष नितीन चौगुले यांनी केला आहे.
साधुसंतांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी सुरक्षा कायद्याची मागणी ज्या पद्धतीने चित्रपट आणि मालिकांच्या मध्ये साधू संतांच्या बद्दल निगेटिव्हिटी दाखवण्यात येते, त्यामुळेच अशा प्रकारचे हल्ले साधूंच्यावर होत आहेत. पालघर जिल्ह्यातील साधूंचे हत्याकांड असो किंवा लवंगा या ठिकाणी घडलेल्या साधूंच्यावर मारहाणीचा प्रकार, हा सर्व प्रकार चित्रपट आणि मालिकांच्या साधूंच्या बद्दल दाखवण्यात येणाऱ्या चुकीच्या गोष्टींमुळे घडत आहे. त्यामुळे यापुढे साधू संतांची बदनामी करणारे चुकीचे चित्रपट मालिकांवर केंद्र आणि राज्य सरकारने बंदी घालावी. तसेच देशातल्या सर्व साधुसंतांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी डॉक्टर आणि पत्रकारांच्या प्रमाणे सुरक्षा कायदा करावा, अशी मागणी देखील चौगुले यांनी यावेळी केली ( Shiv Pratishthan Yuva Hindustan demands ) आहे.