ETV Bharat / state

सात वर्षाच्या चिमुकलीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अरविंद काटे यांना पत्र - चिमुकलीचे पोलिसांना पत्र

सांगलीच्या वाळवा तालुक्यातील ढगेवाडी येथील सात वर्षाच्या आराध्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना पत्र लिहिले आहे. पोलीस बांधव आपल्या जीवाची पर्वा न करता लोकांसाठी अहोरात्र झटत आहेत, त्यांच्याविषयी आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या चिमुकलीने पत्र लिहीले.

thanks giving letter
सात वर्षाच्या चिमुकलीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अरविंद काटे यांना पत्र
author img

By

Published : May 12, 2020, 3:19 PM IST

Updated : May 12, 2020, 7:42 PM IST

सांगली - सात वर्षाच्या चिमुकलीने लिहिले कुरळप पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अरविंद काटे यांना पत्र लिहीले आहे. पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी ट्वीटवरून चिमुकल्या आराध्याचे आभार मानले. आराध्या विजय खोत असे त्या चिमुकलीचे नाव आहे.

सात वर्षाच्या चिमुकलीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अरविंद काटे यांना पत्र

सांगलीच्या वाळवा तालुक्यातील ढगेवाडी येथील सात वर्षाच्या आराध्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना पत्र लिहिले आहे. पोलीस बांधव आपल्या जीवाची पर्वा न करता लोकांसाठी अहोरात्र झटत आहेत, त्यांच्याविषयी आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या चिमुकलीने पत्र लिहीले.

thanks giving letter
सात वर्षाच्या चिमुकलीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अरविंद काटे यांना पत्र

सहाय्यक पोलीस निरीक्षक अरविंद काटे यांना आराध्याने पत्र लिहिले आहे. 'पोलीस काका तुम्ही आमच्यासाठी किती काम करता. कित्येक दिवस झाले तुम्ही तुमच्या कुटूंबाला वेळ देऊ शकला नाहीत. पण आमच्यासाठी रोज गावात येऊन लोकांना कोरोनाबद्दल माहिती देत असता. आम्हा मुलांना घरात बसून कंटाळा आला आहे. काका, कधी संपणार कोरोना? तुमच्यासारखे सगळीकडे पोलीस काका फिरत असतात, यामुळे आम्ही घरात सुखरूप आहे. तुमचे म्हणणे आम्हाला पटले आहे. आम्ही घरात थांबून कोरोनाला हरवणार आहे. तुम्ही पण सर्वजण काळजी घ्या', असे तिने पत्रात लिहीले आहे.

आराध्याने पोलिसांप्रती आपुलकीची भावना पत्राद्वारे लिहून कुरळप पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अरविंद काटे यांच्याकडे सुपूर्द केले. तर सांगली जिल्हा अधीक्षक सुहेल शर्मा यांनी या चिमुकलीचे ट्वीट वरून आभार मानले आहेत.

Last Updated : May 12, 2020, 7:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.