ETV Bharat / state

सांगलीत महापौर आणि उपमहापौरांचे अखेर राजीनामे; प्रदेशाध्यक्षांच्या आदेशानंतर निर्णय

महापालिकेतील भाजपचे महापौर आणि उपमहापौर यांनी पक्षाच्या आदेशानुसार राजीनामा दिला आहे. कार्यकाळ संपल्याने तसेच पक्षाच्या आदेशानुसार हे राजीनामे देण्यात आले आहेत.

sangli mayor news
सांगलीत महापौर आणि उपमहापौरांचे अखेर राजीनामे; प्रदेशाध्यक्षांच्या आदेशानंतर निर्णय
author img

By

Published : Jan 20, 2020, 9:06 PM IST

सांगली - महापालिकेतील भाजपचे महापौर आणि उपमहापौर यांनी पक्षाच्या आदेशानुसार राजीनामा दिला आहे. कार्यकाळ संपल्याने तसेच पक्षाच्या आदेशानुसार हे राजीनामे देण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक दिवस सुरू असणाऱ्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेवर भाजपची सत्ता होती. मिरजच्या नगरसेविका संगीता खोत यांची महापौर तर सांगलीचे नगरसेवक धीरज सूर्यवंशी यांची उपमहापौर पदी निवड झाली. महापौर व उपमहापौरांच्या निवड प्रक्रियेवेळी दोन्ही पदाधिकाऱ्यांना सव्वा वर्षांची मुदत देण्यात आली. ही मुदत संपल्यानंतरही महापौर आणि उपमहापौर यांनी राजीनामे दिले नाहीत. यामुळे काही इच्छुकांनी पक्ष श्रेष्ठींवर दबाव टाकत पदाधिकारी बदलण्याची मागणी केली.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी संगीता खोत आणि धीरज सूर्यवंशी यांनी राजीनामा देण्याचे आदेश दिले. यानुसार आज महापालिकेच्या सभेत संगीता खोत आणि धीरज सूर्यवंशी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. राजीनाम्यानंतर संगीता खोत यांनी जनतेची सेवा करायला मिळाल्याने आभार व्यक्त केले.

कोण बसणार खुर्चीवर ?

महापौर व उपमहापौर यांच्या राजीनाम्यानंतर आता राजकीय हालचालींना वेग येणार आहे. महापौर पदासाठी सविता मदने आणि गीता सुतार यांसह कल्पना कोळेकर भाजपकडून प्रबळ दावेदार मानले जात आहेत. आता पक्षाकडून कोणाला संधी मिळणार, हे पाहाणे औत्सुक्याचे असणार आहे.

Intro:File name - mh_sng_01_mnp_rajiname_vis_01_7203751 - mh_sng_01_mnp_rajiname_vis_03_7203751

सांगली महापालिकेचे भाजपाचे महापौर आणि उपमहापौर यांचे अखेर राजीनामे...

अँकर : सांगली महापालिकेचे भाजपाचे महापौर आणि उपमहापौर यांनी पक्षाच्या आदेशानुसार आज आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. कार्यकाळ संपल्याने पक्ष आदेशानुसार हे राजीनामे देण्यात आले आहेत.त्यामुळे गेली अनेक दिवस सुरू असणाऱ्या चर्चेला पूर्ण विराम मिळाला आहे.

सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेवर भाजपाची सत्ता आहे.सत्ते नंतर भाजपाच्या मिरजेच्या नगरसेविका संगीता खोत यांची महापौर तर सांगलीचे नगरसेवक धीरज सूर्यवंशी यांची निवड झाली होती. महापौर उपमहापौर निवडीवेळी दोन्ही पदाधिकारी यांना सव्वा वर्षांची मुदत देण्यात आली होती. ही मुदत संपूनही अद्याप महापौर आणि उपमहापौर यांनी राजीनामे दिले नसल्याने याबाबत काही इच्छुकांनी भाजपा श्रेष्ठीवर दबाव टाकत पदाधिकारी बदलण्याची आग्रही मागणी केली होती.यानुसार भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगली महापालिकेचे महापौर संगीता खोत आणि उपमहापौर धीरज सूर्यवंशी यांनी राजीनामे द्यावेत असे आदेश दिले होते. यानुसार आज सांगली महापालिकेच्या सभेत महापौर संगीताताई खोत आणि उपमहापौर धीरज सूर्यवंशी यांनी आपल्या पदाचा राजीनामा महापौर संगीताताई खोत यांच्याकडे तर महापौर संगीताताई खोत यांनी आपला महापौर पदाचा राजीनाम आयुक्त नितीन कापडणीस यांच्याकडे सोपवले आहे.
या राजीनाम्यानंतर बोलताना संगीताखोत यांनी पक्षाने महापौर बनण्याची संधी दिली.आणि गेल्या दीड वर्षात महापालिका क्षेत्रात चांगले काम करण्याचा प्रयत्न राहिला आहे.आणि महापौर पदी काम करताना अनेक अनुभव आले, पण सांगलीकर जनतेच्या सेवेसाठी काम करण्याची संधी मिळाली आणि यापुढेही शहराच्या विकासासाठी आपला पुढाकार असेल ,असं मत यावेळी संगीता खोत यांनी व्यक्त केले आहे.

बाईट - संगीता खोत - माजी महापौर, सांगली.

महापौर उपमहापौर यांच्या राजीनाम्यानंतर आता राजकीय हालचालींना वेग येणार आहे.महापौर पदासाठी सविता मदने आणि गीता सुतार आणि कल्पना कोळेकर हे भाजपाकडून प्रबळ दावेदार मानले जात आहेत.मात्र पक्षा कडून कोणाला संधी मिळणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

Body:.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.