सांगली : सांगली जिल्ह्यातील दहा तालुक्यामधील 416 ग्रामपंचायतीसाठी अत्यंत चुरशीने मतदान पार पडले ( Sangli Gram Panchayat Election ) आहे. एकूण 447 पैकी 31 ग्रामपंचायत या बिनविरोध झाल्या आहेत. तर 38 गावातील सरपंच निवडणूक बिनविरोध झाली आहे. त्यामुळे 416 ग्रामपंचायत आणि सरपंच पदासाठी मतदान पार पडत आहे. गावागावात सगळ्यापासून मतदान केंद्रांवर आता मतदारांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहे.
1 हजार 815 मतदान केंद्रे : मतदानासाठी एकूण 1 हजार 815 मतदान केंद्रे आहेत. एकूण 10 लाख 90 हजार 424 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये 5 लाख 64 हजार 608 पुरूष मतदार आहेत. 5 लाख 25 हजार 806 स्त्री मतदार तर इतर 10 मतदार आहेत. मतदानासाठी आवश्यक असणारी इव्हीएम मशीन सीयू 2 हजार 80 तर बीयू 3 हजार 17 आहेत. निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी पुरेशा प्रमाणात वाहन व्यवस्था व एकूण 10 हजार 257 अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये केंद्राध्यक्ष 2 हजार 50, मतदान अधिकारी-1, मतदान अधिकारी-2 व मतदान अधिकारी-3 प्रत्येकी 2 हजार 50, मतदान अधिकारी-4 - 13 आणि शिपाई 2 हजार 44 आहेत. ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीमध्ये मतदारांनी मतदानाचा पवित्र हक्क निर्भय व नि:पक्षपणे बजावावा,असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले ( Sangli Gram Panchayat Election Voting ) आहे.
हिराबाई पडळकर सरपंच पदाच्या उमेदवार : भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पडळकरवाडी या ठिकाणी आपल्या मतदानाचा हक्क बजावला (Gopichand Padalkar Voting ) आहे. पडळकरवाडी या ठिकाणी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या आई हिराबाई पडळकर या सरपंच पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात ( Hirabai Padalkar Sarpanch Candidate ) उतरल्या आहेत. त्यामुळे या निवडणुकीकडे सगळ्यांचा लक्ष लागून राहिलेला आहे.