सांगली - गणेशोत्सव आणि मोहरमच्या निमित्ताने हिंदू-मुस्लीम ऐक्याचे दर्शन सांगलीत पाहायला मिळाले. हिंदू बांधवानी ताबुतांचे स्वागत केले, तर मुस्लीम बांधवांच्या हस्ते गणेश आरती करण्यात आली. ताबूत भेटी आणि गणपतीची आरतीचे हे दृश्य डोळ्यांचे पारणे फेडणारे होते.
हेही वाचा - #Video: गणपती विसर्जन मिरवणुकीत मनसोक्त नाचले पोलीस!
हिंदू-मुस्लीम ऐक्याला मजबूत करणारा प्रसंग शनिवारी रात्री सांगलीकरांनी अनुभवला. शहरात ताबुतांच्या भेटी गणपती पेठेतील झाशी चौक येथील गणेश उत्सवाच्या मंडळासमोर आल्या. या ताबुतांचे गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून स्वागत करण्यात आले. तर तांबूत भेटीच्या निमित्ताने उपस्थित मुस्लीम बांधवांनी गणेशोत्सवामध्ये सहभागी होत गणरायाची आरती केली.
हेही वाचा - मोर्शीतील पुरातून सुरक्षित स्थळी हलवलेल्या गणरायाची पुन्हा स्थापना, व्हिडिओ व्हायरल
अनेक ठिकाणी मोहरमच्या मिरवणुका गणेश मंडळांसमोरुन आणि गणेश मिरवणुका मशिदींसमोरुन जाताना तणावाचे वातावरण निर्माण होण्याच्या घटना घडत असतात. मात्र, सांगलीत घडलेली ही घटना या सर्वांना एक नवा मार्ग दाखवणारी असून सामाजिक एकोपा घट्ट करणारी आहे.
हेही वाचा - पुण्यात देखाव्यांवर 'चांद्रयान २' मोहिमेची छाप, राम मंदिराच्या प्रतिकृतीचीही निर्मिती
सांगलीतल्या महापुरामुळे अनेक जाती-पातीच्या भिंती पुरात वाहून गेल्या. प्रत्येक समाज एकमेकांच्या मदतीला धावून गेल्याचे चित्र यादरम्यान दिसून आले. आता पूर ओसरल्यानंतर गणेशोत्सव आणि मुस्लीम बांधवाचा मोहरम हा सण साध्या पद्धतीने साजरा होत आहेत.