ETV Bharat / state

सांगली जलमय : महापुराच्या विळख्यात अजूनही हजारो नागरिक, बचावकार्य युद्धपातळीवर सुरु - sangli flood today

जिल्ह्यात प्रलयकारी महापुराने थैमान घातले आहे. कृष्णा आणि वारणा नद्यांच्या महापुरामुळे १०० हून अधिक गावातील ८० हजारहुन अधिक नागरिकांचे स्थलांतर झाले आहे. तर, हजारो नागरिक आद्यपही पुरात अडकले आहेत. मात्र, त्यांच्या बचावकार्यामध्ये बोटींची कमतरता ही मोठी अडचण येत आहे. पण, तरीही बचाव कार्यासाठी एनडीआरएफ आणि लष्कराकडून युध्दपातळीवर काम सुरू आहे.

sangli flood update still thousands of people stuck in flood rescue operation in process
author img

By

Published : Aug 8, 2019, 7:57 AM IST

Updated : Aug 8, 2019, 1:30 PM IST

सांगली - जिल्ह्यात प्रलयकारी महापुराने थैमान घातले आहे. कृष्णा आणि वारणा नद्यांच्या महापुरामुळे १०० हून अधिक गावातील ८० हजारहुन अधिक नागरिकांचे स्थलांतर झाले आहे. तर, हजारो नागरिक आद्यपही पुरात अडकले आहेत. मात्र, त्यांच्या बचावकार्यामध्ये बोटींची कमतरता ही मोठी अडचण येत आहे. पण तरीही बचाव कार्यासाठी एनडीआरएफ आणि लष्कराकडून युध्दपातळीवर काम सुरू आहे.

सांगली जलमय : महापुराच्या विळख्यात अजूनही हजारो नागरिक, बचावकार्य युद्धपातळीवर सुरु

पुनर्वसन करण्यात आलेली आकडेवारी :

मिरज - 19 गावांतील 3,639 कुटुंबांतील 19,697 लोक व 5,580 जनावरे.

पलूस - 22 गावांतील 4,114 कुटुंबांतील 19,204 लोक व 5,510 जनावरे.
वाळवा - 30 गावांतील 4,307 कुटुंबांतील 19,532 लोक व 7,279 जनावरे.
शिराळा - 17 गावांतील 292 कुटुंबांतील 1,318 लोक व 2,298 जनावरे.

तर, सांगली महानगरपालिका क्षेत्रातील 907 कुटुंबांतील 9,963 लोक व 443 जनावरे यांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले आहे.

संपर्क तुटलेली गावं..
मिरज - बामणी, जुनी धामणी, अंकली, हरिपूर, मौजे डिग्रज.
वाळवा - शिरगाव, भरतवाडी.
पलूस - भिलवडी, तावदरवाडी, सुखवाडी, राडेवाडी, सूर्यगाव, तुपारी, बुर्ली, नागराळे, दह्यारी, घोगाव, पुणदी.

या गावांचा संपर्क तुटल्यामुळे याठिकाणी हजारो नागरिक अद्याप अडकून पडले आहेत.

पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासन अत्यंत गांभीर्याने प्रयत्नशील आहे. जिल्ह्यात तीन राष्ट्रीय आपत्ती निवारण पथके (एनडीआरएफ) दाखल झाली असून टेरिटोरियल आर्मीचे 211 जवान दाखल झाले आहेत. यासोबतच कोल्हापूर, पुणे-चिंचवड महानगरपालिका यांच्या पथकांकडून युद्ध पातळीवर बचावकार्य सुरु आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेला प्रशासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये, अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.

सरफराज सनदी - सांगली 

Av

Feed send व्हाट्सएप

स्लग - महापूराच्या विळख्यात अद्यापही हजारो नागरिक अडकलेले ,लष्कर आणि एनडीआरएफ पथकांकडून युद्धपातळीवर बचाव कार्य ..

अँकर - सांगली जिल्ह्यात प्रलयंकारी महापुराने थैमान घातला आहे.कृष्णा आणि वारणा नद्यांच्या महापुरामुळे १०० हुन अधिक गावातील ८० हजारहुन अधिक नागरिकांचे स्थलांतर झाले आहे.तर हजारो नागरिक आद्यपही पुरात अडकले आहेत.आणि मदतीसाठी हाक देत आहेत.मात्र यामध्ये बोटींची कमतरता ही मोठी अडचण येत आहे. पण तरीही
बचाव कार्यासाठी एनडीआरएफ आणि लष्कराकडून युध्दपातळीवर काम सुरू आहे.सांगली शहरात पाण्याने 56 फुटांची पातळी गाठली आहे..

व्ही वो- सांगली जिल्ह्यात कृष्णा आणि  वारणा नद्यांना महापुर आला आहे.त्यामुळे जिल्ह्यातील पूर स्थिती गंभीर बनली आहे.दोन्ही नदी काठच्या गावांना मोठा फटका बसला आहे.सुमारे १०० हुन अधिक गावं आणि सांगली शहराला महापुराचा वेढा पडला आहे.यामुळे या सुमारे 80 हजारहुन अधिक नागरिकांना स्थलांतर करावे लागले आहे,तर या पुरातील सुमारे 13 हजार 259 कुटुंबांतील 67 हजार 503 लोक व 21 हजार 110 जनावरे यांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 

पुनर्वसन करण्यात आलेली आकडेवारी. 

मिरज तालुक्यातील 19 गावांतील 3 हजार 639 कुटुंबांतील 19 हजार 697 लोक व 5 हजार 580 जनावरे .

पलूस तालुक्यातील 22 गावांतील 4 हजार 114 कुटुंबांतील 19 हजार 204 लोक व 5 हजार 510 जनावरे .

वाळवा तालुक्यातील 30 गावांतील 4 हजार 307 कुटुंबांतील 19 हजार 532 लोक व 7 हजार 279 जनावरे 

शिराळा तालुक्यातील 17 गावांतील 292 कुटुंबांतील 1 हजार 318 लोक व 2 हजार 298 जनावरे 

सांगली महानगरपालिका क्षेत्रातील 907 कुटुंबांतील 9 हजार 963 लोक व 443 जनावरे यांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले आहे. 

संपर्क तुटलेली गावं..

मिरज तालुक्यातील बामणी, जुनी धामणी, अंकली, हरिपूर, मौजे डिग्रज, 

वाळवा तालुक्यातील शिरगाव,भरतवाडी, 

पलूस तालुक्यातील भिलवडी, तावदरवाडी, सुखवाडी, राडेवाडी, सूर्यगाव, तुपारी, बुर्ली, नागराळे, दह्यारी, घोगाव, पुणदी तर्फे वाळवा या गावांचा संपर्क तुटला आहे.

त्यामुळे याठिकाणी हजारो नागरिक अद्याप अडकून पडली आहेत.तर याचा बरोबर आसपासच्या गावातही नागरिक पुराच्या विळख्यात सापडले आहेत.मात्र प्रशासनाची मदत तोकडी ठरत आहेत.

जिल्ह्यात तीन राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक ( NDRF ) टीम दाखल झाल्या असून टेरिटोरियल आर्मीचे 211 जवान व
कोल्हापूर, पुणे-चिंचवड महानगरपालिका पथकांच्याकडून युद्ध पातळीवर बचाव कार्य सूरु आहे.

तर अद्यापही अनेक गावात आणि सांगली शहरातील पुरात नागरिक अडकली आहेत.मात्र त्यांच्या पर्यंत मदत पोहचण्यात मोठे अडथळे येत आहेत.मात्र
पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासन अत्यंत गांभीर्याने प्रयत्नशील आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेला प्रशासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले असून नागरिकांनी घाबरून जावू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.

Last Updated : Aug 8, 2019, 1:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.