सांगली - जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप कमी झालेला नाही, सध्याचा पॉझिटिव्ह रेट हा 22 टक्के इतका आहे, तो दहा टक्क्यांपर्यंत येणे अपेक्षित असल्याने कोरोना रुग्णसंख्या कमी होण्याच्या दृष्टीने लागू असलेले लॉकडाऊन आणखी काही दिवस वाढवण्याबाबत मते व्यक्त होत आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसात याबाबत बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल, असे स्पष्ट करत 26 मे पर्यंत असणारा लॉकडाऊन वाढवण्याचे अप्रत्यक्ष संकेत जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिले आहेत. ते सांगलीमध्ये बोलत होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक -
सांगली जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर पाच मे पासून कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यानंतर तो टप्प्याटप्प्याने वाढवण्यात आला. सध्या 26 मेपर्यंत जिल्ह्यात कडक लॉकडाऊन आहे. मात्र जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्या अद्याप कमी झालेली नाही. त्या पार्श्वभूमीवर जलसंपदा तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात रविवारी आढावा बैठक पार पडली.
लॉकडाऊन वाढवण्याचे संकेत -
या बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, सांगली जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी करण्याच्या दृष्टीने जास्तीत जास्त टेस्टिंग करण्याची आवश्यकता आहे, त्यादृष्टीने टेस्टिंग वाढवल्यामुळे 22 टक्के इतका पॉझिटिव्ह दर झालेला आहे, हे जरी जास्त असले तरी यामुळे कोरोना रुग्णांवर वेळेत उपचार करून मृत्यू दर रोखण्यात मदत होणार आहे. तर टेस्टिंग वाढल्याने रुग्ण संख्याही कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच सध्याचा 22 टक्के पॉझिटिव दर, 10 टक्क्यांच्या खाली यायला पाहिजे. तो खाली येण्याच्या दृष्टीने व रुग्ण संख्या कमी करण्यासाठी जिल्ह्यात सध्या कडक लॉकडॉऊन सुरू आहे आणि आजच्या बैठकीत लॉकडाऊनचे उचललेले पाऊल आणखी काही दिवस कायम ठेवण्याबाबतचे मते अनेकांनी व्यक्त केली आहेत. याबाबत येत्या काही दिवसातील परिस्थितीनुसार बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल, असे पालकमंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट करत जिल्ह्यातील 26 मे पर्यंतचा असणारा कडक लॉकडाऊन आणखी वाढवण्याचे संकेत दिले आहेत.
सांगली जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट २२ टक्के.. पालकमंत्र्यांकडून लॉकडाऊन वाढवण्याचे संकेत - सांगली जिल्ह्यातील लॉकडाऊन वाढणार
सांगली जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप कमी झालेला नाही, सध्याचा पॉझिटिव्ह रेट हा 22 टक्के इतका आहे, तो दहा टक्क्यांपर्यंत येणे अपेक्षित असल्याने कोरोना रुग्णसंख्या कमी होण्याच्या दृष्टीने लागू असलेले लॉकडाऊन आणखी काही दिवस वाढवण्याबाबत मते व्यक्त होत आहेत. पालकमंत्री जयंत पाटील यांनीही तसे संकेत दिले आहेत.