ETV Bharat / state

ओमायक्रॉनच्या मुकाबल्यासाठी सांगली जिल्हा प्रशासन सज्ज - ओमायक्रॉन संकटासाठी प्रशासन सज्ज

सांगली जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव आता जवळपास संपुष्टात आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मात्र, ओमायक्रॉनच्या नव्या संकटाला ( Omicron Variant ) सामोरे जाताना जिल्हा प्रशासन दक्ष झाल्याचे पहायला मिळत आहेत. जिल्ह्यात एकमेव कोरोना सेंटर सध्या मिरज शासकीय रुग्णालय या ठिकाणी सुरू आहे. मात्र, जिल्ह्यात 105 कोविड रुग्णालय व कोविड हेल्थ सेंटर सुसज्ज आहेत.

शासकीय रुग्णालय मिरज
शासकीय रुग्णालय मिरज
author img

By

Published : Dec 8, 2021, 1:21 AM IST

Updated : Dec 8, 2021, 5:00 AM IST

सांगली - जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव आता जवळपास संपुष्टात आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मात्र, ओमायक्रॉनच्या नव्या संकटाला ( Omicron Variant ) सामोरे जाताना जिल्हा प्रशासन दक्ष झाल्याचे पहायला मिळत आहेत. जिल्ह्यात एकमेव कोरोना सेंटर सध्या मिरज शासकीय रुग्णालय या ठिकाणी सुरू आहे. मात्र, जिल्ह्यात 105 कोविड रुग्णालय व कोविड हेल्थ सेंटर सुसज्ज आहेत.

आढावा घेताना प्रतिनिधी

कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरला !

सांगली जिल्ह्यामध्ये गेल्या महिनाभरापासून रुग्ण संख्या झपाट्याने कमी होऊ लागलेली आहे. गेल्या आठ दिवसांपासून कोरोनाची रुग्ण संख्या दहाच्या आत राहिली आहे. कधी 1, कधी 2 तर कधी 7, अशी रुग्ण संख्या सध्या आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादूर्भाव जवळपास संपुष्टात आल्याचे चित्र यामुळे पाहायला मिळत आहे.

अवघे 35 रुग्ण उपचाराखाली ...

त्यामुळे दुसर्‍या लाटेत सांगली जिल्ह्यात सुरू असलेल्या 105 कोविड हॉस्पिटल व कोविड हेल्थ सेंटर तात्पुरते बंद करण्यात आले आहेत. केवळ मिरजेचे शासकीय कोरोना रूग्णालय हे एकमेव सुरू आहे. ज्या ठिकाणी केवळ 35 कोरोना रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. कोरोना परिस्थितीचे दिलासादायक चित्र असले तरी जिल्हा प्रशासनाने सर्व पातळ्यांवर खबरदारी घेतली आहे.

ओमायक्रॉनसाठी प्रशासना सज्ज ...

राज्यात ओमायक्रॉनचे एक नवं संकट उभा राहिला आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनही दक्ष झाले आहे. जिल्हा प्रशासनाकडून युद्धपातळीवर कोरोनाचे लसीकरण सुरू आहे. त्याचबरोबर ओमायक्रॉन संकटाला तोंड देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यातील 105 कोविड रुग्णालय व कोविड हेल्थ सेंटरची सज्जता ठेवण्यात आली आहे. कोरोना रुग्णांची संख्या किंवा ओमायक्रॉनचे नवे संकट जिल्ह्यात उभा राहिले तर तात्पुरती बंद करण्यात आलेली कोविड रुग्णालय व कोविड हेल्थ सेंटर पुन्हा सुरू करण्याची तयारी प्रशासनाकडून करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा कोरोना नोडल अधिकारी डॉ. संजय साळुंखे यांनी दिली आहे.

हे ही वाचा - अवकाळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेणार - मंत्री जयंत पाटील

Last Updated : Dec 8, 2021, 5:00 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.