सांगली - जिल्ह्यातील 152 ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडत असून या निवडणुकीच्या लढतीचे चित्र आता स्पष्ट झालेले आहे. सोमवारी अर्ज माघार घेण्याच्या अखेरच्या दिवशी तब्बल दोन हजार 42 उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे 3 हजार 76 उमेदवार हे निवडणूक रिंगणात आहेत. तर जिल्ह्यातील 3 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.
3 हजार 76 उमेदवार निवडणूक रिंगणात
सांगली जिल्ह्यातील 152 ग्रामपंचायतीच्या 1 हजार 593 जागांसाठी तब्बल 5 हजार 103 जणांनी उमेदवारी दाखल केल्याने या निवडणुकीत मोठी चुरस निर्माण होण्याचे चित्र होते. यामुळे अनेक ठिकाणी स्थानिक नेत्यांची मोठी डोकेदुखी वाढली होती. मात्र अर्ज माघारीच्या दिवशी अनेक उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला. अखेरच्या दिवशी 2 हजार 47 जणांना आपली उमेदवारी मागे घेतल्याने आता 3 हजार 76 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
3 ग्रामपंचायतीसह अनेक जागा बिनविरोध
जिल्ह्यातील 152 पैकी खानापूर तालुक्यातील भडकेवाडी आणि जत तालुक्यातील 2 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. तसेच अनेक ठिकाणी काही जागा बिनविरोध झाले आहेत. मात्र 149 ठिकाणी आता या निवडणुकीसाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे. 15 जानेवारी रोजी या ग्रामपंचायतींसाठी मतदान पार पडणार असून 18 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे.
हेही वाचा - इतिहासात पहिल्यांदाच जतची यल्लमा देवीची यात्रा रद्द
हेही वाचा - शिक्षक 'सुधीर बंडगर' यांचा प्रेरणादायी नवोपक्रम, राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड